Return Kohinoor to India: "कोहिनूर भारताला परत करा"; ब्रिटनमधील Live TV Show दरम्यान 'ती' मोठ्याने ओरडली

Return Kohinoor to India: ब्रिटनमधील एका टीव्ही चॅनेलवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोहिनूर हिरा या विषयावरुन चर्चा सुरु असतानाच घडला हा प्रकार

Updated: Feb 21, 2023, 07:54 PM IST
Return Kohinoor to India: "कोहिनूर भारताला परत करा"; ब्रिटनमधील Live TV Show दरम्यान 'ती' मोठ्याने ओरडली title=
kohinoor

Return Kohinoor to India: कोहिनूर हिरा (Kohinoor Dimond) असं नुसतं ऐकलं तरी भारतीयांचा स्वाभिमान ढवळून निघतो. सध्या ब्रिटनमध्ये (UK) असलेला हा हिरा जगातील सर्वात मौल्यवान हिऱ्यांपैकी एक आहे. इंग्रजांनी भारतावर राज्य केल्या त्यानंतर भारत सोडून जाताना ज्या मौल्यवान गोष्टी ते सोबत घेऊन गेले त्यामध्ये कोहिनूरचाही समावेस होता. सध्या कोहिनूर ब्रिटनमध्येच आहे. नुकतीच एका ब्रिटीश वृत्तवाहिनीने कोहिनूर हिरा भारताला परत पाठवावा की नाही याबद्दल चर्चासत्र आयोजित केलं होतं. या चर्चेदरम्यान भारतीय वंशाच्या महिला पत्रकार नरिंदर कौर आणि मुलाखतकार एम्मा वेब यांच्याच चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

कोहिनूर हा लुटीचा पुरावा

या चर्चासत्राच्या कार्यक्रमादरम्यान ही मुलाखतकार ओरडू लागली. त्यावेळी राग अनावर झाल्याने भारताच्या नरिंदर कौर या सुद्धा समोरच्या ब्रिटीश पत्रकाराकडे पाहून जोरात ओरडून, "तुम्हाला इतिहास माहिती नाही," असं म्हणाल्या. "कोहिनूर हा रक्तपात आणि ब्रिटीशांनी केलेल्या लुटीचा पुरावा आहे. तो (कोहिनूर) भारताला परत करा," असंही नरिंदर कौर म्हणाल्या. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आमचाच हिरा पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे

'गुड मॉर्निंग ब्रिटन' नावाच्या कार्यक्रमामध्ये कोहिनूर हिरा भारताला परत करावा की नाही या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आलेली. या विषयातील जाणकार कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय वंशाच्या नरिंदर कौर आणि ब्रॉडकास्टर एम्मा वेब यांच्यादरम्यान शाब्दिक चकमक झाली. यावेळेस वेब यांनी चुकीचे संदर्भ दिल्याने संतापलेल्या नरिंदर कौर या ओरडून ओरडूनच त्यांना खोडून काढण्याचा प्रयत्न करत होत्या. तुम्हाला इतिहास कळत नाही. तुम्ही फक्त कोहिनूर भारताला परत करा. तुम्ही तो तिथून इथे आणला आणि आता तिथून इथं आलेल्या लोकांना हा हिरा पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात, असा टोला नरिंदर कौर यांनी लगावला. जीएमबी नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

तेव्हापासून हा हिरा पुन्हा चर्चेत

यापूर्वीच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कोहिनूर हिऱ्यासंदर्भात घोषणा करताना हा हिरा पुन्हा भारतात आणण्यासंदर्भातील योग्य मार्ग कायदेशीर निघेल अशी आशा व्यक्त केली होती.  ब्रिटनवर अनेक दशकं राज्य करणाऱ्या क्विन एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या मृत्यूनंतर हा हिरा पुन्हा भारतात आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे.