हॉटेलमध्ये जाताय सावधान... Birthday पार्टी पडली महागात, मॅनेजरने दोघांना दिलं ऍसिड

वाढदिवसासाठी आलेल्या 'त्या दोघांसोबत मॅनेजरने असं काय केलं? ज्यामुळे माजली एकच खळबळ   

Updated: Oct 4, 2022, 01:25 PM IST
हॉटेलमध्ये जाताय सावधान... Birthday पार्टी पडली महागात, मॅनेजरने दोघांना दिलं ऍसिड title=

Birthday Party : खास दिवस असेल तर आपण प्रत्येक जण आनंद साजरा करण्यासाठी बाहेर फिरायला जातो, नाहीतर एखाद्या चांगल्या हॉटेल पार्टी करण्यासाठी जातो. पण हॉटेलमध्ये एखादी धक्कादायक घटना आपल्यासोबत घडली तर... आपल्याला या गोष्टीचा विचार केल्यावरही भीती वाटेल. असं काही झालं आहे पाकिस्तानमधील एका कुटुंबासोबत. वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. 

पाकिस्तानमधील लाहोरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या कुटुंबाला मॅनेजरने चक्क पाण्याच्या बाटलीत ऍसिड दिलं. ज्यामुळे दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी लारी अड्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

मोहम्मद आदिल यांनी पोलिसांना सांगितलं की, '27 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या पार्टीसाठी कुटुंबासह कवी हॉटेलमध्ये  गेलो होतो. तिथे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पिण्यासाठी पाण्याची बाटली ठेवली.' 

ते पुढे म्हणाले, 'माझ्या पुतण्याने हात धुण्यासाठी बाटलीतून पाणी हातावर टाकताच तो जोरजोरात ओरडू लागला. त्याच्या हाताला दुखापत झाल्यानंतर या घटनेची माहिती त्यांनी लगेच रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला दिली.'

फक्त पुतण्या नाही तर, मोहम्मद आदिल यांनी भाचीला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं आहे. भाचीने पाणी समजून ऍसिड प्यायल्यामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. सध्या याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. 

याप्रकरणी पोलीस अधिकारी ताहिर वकास सांगतात की, हॉटेल मॅनेजर मोहम्मद जावेदसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. तपास पूर्ण होईपर्यंत हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे.