गेंड्यासमोर म्हैस आक्रमक, चढवला हल्ला; गेंड्याने एकच मारला पण सॉलिड मारला.. व्हिडीओ समोर

 हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील असल्याचं समजतं.  

Updated: Oct 3, 2022, 10:39 PM IST
गेंड्यासमोर म्हैस आक्रमक, चढवला हल्ला; गेंड्याने एकच मारला पण सॉलिड मारला.. व्हिडीओ समोर title=

Viral Video: आपण इंटरनेटवर अनेक व्हिडीओ पाहतो. काही प्रॅन्क व्हिडीओ, काही लहान मुलांचे, काही छान परफॉर्मन्स किंवा काही प्राण्यांचे व्हिडीओ. असे व्हिडीओ कायम आपलं लक्ष वेधून घेतात, असेच व्हिडीओ प्रचंड व्हायरल देखील होतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ आहे एका म्हशीचा आणि तिने थेट पंगा घेतलाय एका  गेंड्याशी. आता म्हैस शक्तिशाली आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. म्हशीला राग आला तर ती कुणालाही शिंगावर घेऊ शकते हेही आपल्याला ठाऊक आहे. इथे हे स्पष्ट पाहायलाच मिळालं. मात्र या व्हिडिओमध्ये ही म्हैस थेट गेंड्याशी भिडलेली पाहायला मिळते. 

हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला. सुरुवातीला आपल्याला व्हिडिओमध्ये अनेक प्राणी पाहायला मिळतात. यामध्ये झेब्रा देखील पाहायला मिळतो. म्हशींचा म्हशींचा कळप देखील पाहायला मिळतो. या कळपापुढे एक म्हैस एका गेंड्यासोबत थेट पंगा घेताना पाहायला मिळते. सुरुवातीला ही म्हैस गेंड्यापेक्षा जास्त प्रबळ असल्याचं पाहायला मिळतं. ही म्हैस जास्त आक्रमक पाहायला मिळते. आक्रमक म्हशीपुढे गेंडा काहीसा मागे गेल्याचं देखील दिसतो. मात्र काही वेळाने हा गेंडा देखील ऍक्शनमध्ये आल्याचं दिसतं. आणि पुढे काय होतं?

पाहा व्हिडीओ : 

काही वेळाने गेंडा ऍक्शन मोडमध्ये येतो, चिडतो... गेंडा चिडल्याने तो म्हशीला थेट त्याच्या एका शिंगाने भिरकावून लावतो. या गेंड्याची शक्ती आपल्यापेक्षा जास्त आहे हे म्हशीला देखील समजते. शेवटी म्हैस पुन्हा आपल्या काळपाकडे गेल्याचं पाहायला मिळते. हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील असल्याचं समजतं.  

Rhino and Buffalo Fight Video Rhino Easily Deals With Aggressive Buffalo