युक्रेन : रशिया विरुद्ध युक्रेन असा संघर्ष सुरू आहे. ह्या युद्धात मोठं नुकसान झालं आहे. संघर्ष अधिक वाढत आहे. या सगळ्या परिस्थितीतीचा आढावा पोहोचवण्याचं काम तिथले स्थानिक रिपोर्टर आणि मीडिया देखील करत आहे. हे सगळं सुरू असताना रिपोर्टरसाठी एक दु: ख आणि धक्कादायक बातमी समोर आली.
काम करत असताना आपल्याच डोळ्यासमोर घरावर हल्ला होताना पाहाणं आणि डोळ्यादेखत घर जमीनदोस्त झालं. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांना उद्ध्वस्त केलं आहे. सध्याची तिथली परिस्थिती इतकी भयंकर आहे की त्याचा विचारही न केलेला बरा. युद्धाचं रिपोर्टिंग स्टुडिओमधून सुरू असताना अँकर आपल्या सहकाऱ्याशी युद्धावर live चर्चा करत होती.
याच LIVE चर्चेदरम्यान रिपोर्टरला आपलं घर उद्ध्वस्त होताना दिसलं. रात्रभर झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये या रिपोर्टरचं घर जमीनदोस्त झालं होतं. एक वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ही रिपोर्टर बीबीसीची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
कॅरिन यांनी ओल्गा यांच्याशी बोलताना सांगितलं की युद्ध आता कीवच्या जवळ पोहोचलं आहे. ओल्गा म्हणाल्या की मला जे फोटो मिळाले आहेत ते माझ्या घराचे असावेत असं मला वाटत आहे. मला माझ्या आईचा मेसेज आला मात्र मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही.
रिपोर्टरचं घर बॉम्बने उडवलं
रिपोर्टर ज्या अपार्टमेंटमध्ये राहात होती तेच बॉम्बने उडवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 मजली इमारत होती. ज्यामध्ये सहाव्या मजल्यावर रिपोर्टर आपल्या कुटुंबीयांसह राहात होती. सुदैवानं या रिपोर्टरचे कुटुंबीय सुखरुप जागी आहेत. त्यांना इजा पोहोचली नाही.