बंगालमधील हिंसाचाराचे या देशांमध्ये पडसाद, आंदोलकांची दोषींवर कारवाईची मागणी

बंगालमधील हिंसाचाराचे विविध देशात पडसाद

Updated: May 10, 2021, 03:32 PM IST
बंगालमधील हिंसाचाराचे या देशांमध्ये पडसाद, आंदोलकांची दोषींवर कारवाईची मागणी title=

कोलकाता : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ अमेरिकेत तीसपेक्षा जास्त शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी हिंसाचाराचा नरसंहार म्हणून निषेध केला आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने परप्रांतीय बंगाली आणि भारतीय नागरिक उपस्थित होते. ते मुख्यतः पश्चिम बंगालहून अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. 'हत्याकांडातील दोषींना कडक शिक्षा द्या. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

बंगालमधील या हिंसाचाराविरोधातील निषेध केवळ अमेरिकेच्या शहरांमध्येच नव्हे, तर ब्रिटनसह इतरही अनेक देशांमध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. आंदोलकांनी हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

बंगालमध्ये एकाचा मृत्यू आणि सहा जखमी

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच सुरू असलेली राजकीय हिंसाचार थांबत नाहीये. शुक्रवारी रात्री बीरभूम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू आणि सहा जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुक्ताईनगर गावची आहे जिथे भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. जखमींवर सूरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाची एक टीम जेव्हा राज्यात हिंसाचाराची चौकशी करत होती तेव्हा ही घटना घडली आहे.