Relationship Tips : क्रशला इम्प्रेस करायचंय, या ट्रीक्स वापरा, मुलगी पटलीच समजा

समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना (Felings) समजत नसतील तर निराश होऊ नका. अशा परिस्थितीत दु:खी होऊन प्रयत्न करणे थांबवू नका. 

Updated: Sep 22, 2022, 10:12 PM IST
Relationship Tips : क्रशला इम्प्रेस करायचंय, या ट्रीक्स वापरा, मुलगी पटलीच समजा title=
प्रातिनिधिक छायाचित्र

Relationship Tips : आवडत्या व्यक्तीला प्रभावित (Impress) करण्यासाठी किंवा एखाद्याला आपलंसं करण्यासाठी (Relationship Advice) अनेक प्रयत्न करतो. पण तरीही समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना (Felings) समजत नसतील तर निराश होऊ नका. अशा परिस्थितीत दु:खी होऊन प्रयत्न करणे थांबवू नका. अशा परिस्थितीत तुम्ही काही पद्धतींचा अवलंब करावा. होय, आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत,  ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्रशला सहज इम्प्रेस करु शकता. चला जाणून घेऊया कसे? (relationship advice love how to impress your crush know this trickes)

आत्मविश्वास हवा

मुद्दा क्रमांक एक म्हणजे तुमच्या आत्मविश्वास हवाच.  आपल्या आवडत्या व्यक्तीला बाहेर पार्टीत भेटत असाल, तर तिच्या मागे भक्कमपणे उभे रहा. यामुळे प्रिय व्यक्ती ही अधिक आकर्षित होईल. यामुळे क्रशला तुमच्या मनात जे चाललंय ते सांगण्यास मदतशीर ठरतं. 

तिला काय आवडतं?

प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत रस असतो. आता तुम्हाला जी मुलगी आवडतेय तिला काय आवडतं याची माहिती घ्या. तिला जे आवडतं तीच तुमची आवड बनवा. यामुळे होईल असं की तुमची क्रश आणखी इम्प्रेस होईल. तसंच 'जेवलीस का?', या पुढे बोलण्याचा विषयही मिळेल.

डोळ्यात डोळे 

क्रशसोबत कायम डोळ्यात डोळे घालून बोला. क्रशला इम्प्रेस करण्याचा हा खास मंत्र आहे.  यामुळे तुमच्या क्रशला तुमच्या भावना समजायला मदत होईल. 

Disclaimer: इथे दिलेली माहिती सर्वसाधारण गृहतकांवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.