Temple attacked in UK : इंग्लंडमध्ये (England) राहणाऱ्या हिंदूंविरोधात पाकिस्तान (Pakistan) मोठा कट रचतोय. दोन दिवसात ब्रिटनच्या दोन शहरात दोन मंदिरांवर हल्ले झालेत. इतकंच नाही तर हिंदूबहुल वस्तीत पाकिस्तान समर्थकांनी अक्षरश धुडगूस घातलाय. पहिली घटना घडली लंडनच्या लेस्टर शहरात. लेस्टर शहरात (leicester) एका शिवमंदिरात मुस्लिम जमावानं तोडफोड केली. भगवा झेंडा फाडून जाळून टाकला. हा हल्ला करणारे सगळे मुस्लिम पाकिस्तानी असल्याचं तपासात समोर आलं.
या हल्ल्यानंतर लेस्टरमधल्या हिंदू बहुल वस्तीतही धुडगूस घालण्यात आला. अल्लाहू अकबरचे नारे लगावण्यात आले. त्यानंतर असाच प्रकार बर्मिंगहॅममध्ये (birmingham) घडला. बर्मिंगहॅमच्या दुर्गा मंदिरात मुस्लिम जमावानं तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मंदिरात घुसण्याचा प्रयत्न हा जमाव करत होता पण स्थानिक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत हा हल्ला रोखून धरला.
हल्ला करणा-या 200 हून अधिक लोकांच्या जमावाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तपासात हे सारे युवक पाकिस्तानी असल्याचं समोर आलं. आता अचानक ब्रिटनमध्ये हिंदूंवर हल्ले कसे सुरु झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर 28 ऑगस्टला आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यानंतर लंडनमध्ये (London) परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानकडून माथेफिरु युवकांना आणखी चिथावणी दिली गेल्याचंही समोर आलंय. दुसरीकडे स्थानिक मुस्लिम मात्र हिंदू मंदिर आणि स्थानिक हिंदूंचं रक्षण करायला समोर आल्याचं दिसलं. स्थानिक मुस्लिम धर्मगुरुंनी शांततेचं आवाहनही केलंय.
लंडनमधल्या हिंदूंमध्ये या हल्ल्यांमुळे दहशतीचं वातावरण आहे. लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांनी दोन्ही घटनांचा निषेध केलाय. नागरिकांची माथी भडकवून वातावरण अस्थिर करायचा पाकिस्तानचा कपटी इरादा यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आलाय.