मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार रशियन न्यूक्लियर डेटरन्स फोर्स अलर्ट मोडवर आहे.
गेल्या काही दशकात प्रथमच एखाद्या देशाने उघडपणे अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे अणुयुद्धात रूपांतर होऊ शकते, हे पुतिन यांच्या हेतूवरून स्पष्ट झाले आहे. पुतीन यांच्या धमकीमध्ये युरोपीयन देशांमध्ये दहशत पसरली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुतीन यांच्या धमकीमुळे युरोपमध्ये विशेषतः मध्य युरोपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलंडपासून बेलारूस आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तयार झालेल्या स्वतंत्र देशांपर्यंत ही लढाई होण्याची भीती आहे. अणुहल्ल्याच्या भीतीने लोक आयोडीनच्या गोळ्या विकत घेण्यासाठी धावत आहेत. अणुहल्ला झाला तर हे आयोडीन त्यांना किरणोत्सर्गापासून वाचवेल असा लोकांचे म्हणणे आहे. आयोडीनच्या गोळ्या ते सिरपची मागणी एवढी वाढली आहे की युरोपातील अनेक देशांमध्ये त्याचा तुटवडा आहे.
फार्मसी युनियनचे अध्यक्ष निकोले कोस्तोव यांच्या म्हणण्यानुसार, 'गेल्या सहा दिवसांत, बल्गेरियाच्या फार्मसीने इतके आयोडीन विकले आहे. की वर्षभरातही इतके आयोडीन विकले गेले नव्हते. अनेक मेडिकल दुकानदारांनी नवीन मालाची ऑर्डर दिली आहे.
आयोडीन हे गोळ्यांच्या किंवा सिरपच्या स्वरूपात घेतले जाते. किरणोत्सर्गाच्या धोक्यात, थायरॉईड आणि कर्करोगासारख्या आजारांपासून मानवी शरीराचे संरक्षण करण्यासाठी आयोडीन प्रभावी मानले जाते. 2011 मध्ये, जपानी अधिकाऱ्यांनी शिफारस केली होती की अपघातग्रस्त फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाजवळ राहणाऱ्या लोकांनी आयोडीन घ्यावे. त्यामुळे आता अणुयुद्धाच्या अनेक देशांमध्ये साठा संपला आहे.
अणुयुद्ध झाल्यास आयोडीन उपयोगी ठरणार नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चेक स्टेट ऑफिस फॉर न्यूक्लियर सेफ्टीचे प्रमुख दाना ड्रबोवा यांच्या म्हणण्यानुसार, 'लोक आयोडीन गोळ्यांबद्दल विचारत आहेत, परंतू अणुयुद्ध होऊच नये यासाठी प्रार्थना करावी. कारण त्यापासून कोणीही वाचू शकणार नाही.