Viral News : एका महिला प्रोफेसरने (Professor) आपल्या घराच्या छतावर बेली डान्स (belly dance) केला आणि याचा व्हिडिओ फेसबूकवर पोस्ट (Facebook Post) केला. पण असं करणं तिला चांगलंच महागात पडलं. ती ज्या विद्यापिठात (University) शिकवत होती. व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर त्या विद्यापीठाने तिला नोकरीवरुन काढून टाकलं. या विरोधात तीने उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली. पण इथेही तिच्याविरोधात निकाल गेला. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार त्या महिला प्रोफेसरला कोणत्याही सरकारी किंवा खासगी विद्यापिठात नोकरी करता येणार नाही.
या महिला प्रोफेसरचं नाव मोना प्रिंस (Mona Prince) असं असून ती इजिप्त (Egypt) या देशातील आहे. मोना प्रिंसाल बेली डान्सची आवड आहे. आपली आवड जपण्यासाठी तीने आपल्या घराच्या छतावर बेली डान्स केला. याचा तीने व्हिडिओही बनवला. काही दिवसांपूर्वीच मोना प्रिंस यांचे बिकनीतले फोटोतही सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आले होते.
मोना प्रिंस सुएज विद्यापिठात (Suez University) इंग्लिश विषयाच्या प्रोफेसर आहेत. न्यायालयाने निर्णय देताना म्हटलं, मोना प्रिंस यांच्या या व्हिडिओमुळे विद्यापिठातील प्राध्यापक म्हणून त्यांची प्रतिमा डागाळली आहे, नैतिक मूल्ये जोपासणे आणि वाढवणं हे प्राधाप्यकाचं कर्तव्य असल्याचं न्यायालयाने सुनावलं. शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अशा गोष्टी पसरवणं समाजासाठी घातक आहे, सार्वजनिक सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याचंही न्यायालयाने निकालात सांगितलं.
मोना प्रिंस यांनी फेसबूकवर शेअर केलेल्या व्हिडिओची तपासणी करण्यात आली त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता मोना प्रिंग यांना कोणत्याही विद्यापीठात नोकरी करता येणार नसून त्यांच्या करिअरला ब्रेक लागला आहे.