कोरोनाशी लढण्यात मोदी अव्वलस्थानी, ट्रम्प यांचा नंबर ऐकून व्हाल हैराण

कोरोनाविरोधातील लढ्यात पंतप्रधान मोदी हे जगात अव्वल असल्याचे समोर आले

Updated: Apr 22, 2020, 10:58 AM IST
कोरोनाशी लढण्यात मोदी अव्वलस्थानी, ट्रम्प यांचा नंबर ऐकून व्हाल हैराण  title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. सर्व देश आपल्या ताकदीनुसार या संकटाचा सामना करत आहेत. जगातील सर्वात ताकदवान देश अमेरिकेने देखील या व्हायरस समोर हात टेकले आहेत. अमेरिकेत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दहा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. यावरुन अमेरिकेच्या सद्य स्थितीचा अंदाज बांधता येऊ शकतो. या दरम्यान एक रिपोर्ट समोर आला असून कोरोनाविरोधातील लढ्यात पंतप्रधान मोदी हे जगात अव्वल असल्याचे समोर आले आहे. 

या रिपोर्टमध्ये दिल्या गेलेल्या अहवालात पंतप्रधान मोगी यांना ६८ पॉईंट्स मिळाले आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मायनस तीन पॉईंट देण्यात आले आहेत. हा रिपोर्ट तयार करणाऱ्या कंपनीने १ जानेवारी २०२० ते एप्रिल २०२० पर्यंत जगभरातील नेत्यांशी चर्चा केली. इतर नेत्यांबद्दल त्यांना प्रश्न विचारुन त्यांचे मत जाणून घेतले. 

अमेरिकेची ग्लोबल डेटा इंटेलीजन्स कंपनी 'मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटीकल इंटेलिजन्स'ने हा रिसर्च केला. कोरोना वायरसशी लढाणाऱ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. 

१ जानेवारीला पंतप्रधान मोदी यांना ६२ पॉईंट्स होते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे पॉईंट्स ६८ पर्यंत गेले. 

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज ओब्रोडोर यांना ३६ पॉईंट्स, ब्रिटीश प्रमुख बोरिस जॉन्सन यांना ३५ पॉईंट्स, ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट मारिसन यांना २६ पॉइंट्स, कॅनडाचे जस्टिन टुड्रो यांना २१ पॉईंट्स, जर्मनीच्या एंजेला मर्केल यांना १६ पॉईंट्स मिळाले आहेत. 

ब्राझीलच्या जेअर बोल्सानारो यांना केवळ आठ पॉईंट्स मिळाले तर अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम यांना मायनस ३ पॉईंट्स मिळाले. फ्रान्सच्या इमॅन्यूअल मॅक्रो यांना मायनस २१ पॉईंट्स तर जपानच्या शिजो आबे यांना मायनस ३३ पॉईंट्स मिळाले आहेत.