मोदी नेपाळ दौऱ्यावर, सीता मंदिरात घेतले दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. 

Updated: May 11, 2018, 12:12 PM IST
 मोदी नेपाळ दौऱ्यावर, सीता मंदिरात घेतले दर्शन title=

काठमांडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. नेपाळमध्ये दाखल होताच सुरुवातीला मोदींनी सीतेच्या जन्मस्थानी भेट दिली.जनपूरमधील सीता मंदिरात मोदींनी दर्शन घेतलं आणि यावेळी खास नेपाळी टोपीही मोदींना भेट देण्यात आली. दौऱ्यात नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान के पी ओली यांच्या भेटीबरोबरच अनेक कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि ओली यांच्या हस्ते नव्या ९०० मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पाचं भूमीपूजन होणार आहे. त्याशिवाय नेपाळमधील जनकपूर ते अयोध्या अशी बस सेवा  पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करणार आहेत.