मुंबई : इंडोनेशियाची राजधानी जकर्ता येथून उड्डाण घेतल्यानंतर बेपत्ता विमानाचा अपघात झाल्याची शक्यता आहे. या विमानात 62 प्रवाशी होते. या विमानाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण घेतल्यानंतर विमानाला अपघात झाल्याचा संशय आहे. इंडोनेशियाच्या तपास यंत्रणांना आज अपघाताच्या जागेजवळ म्हणजेच रविवारी शरीराचे अवयव सापडले आहेत. अहवालानुसार हे विमान त्याच ठिकाणी क्रॅश झाले असल्याची शंका आहे.
इंडोनेशियाचे परिवहन मंत्री बुदी कार्या सुमादी यांनी म्हटले की, एअरलाइन्सचे बोईंग 737-500 विमान (एसजे 182) स्थानिक वेळेनुसार दुपारी अडीच वाजता जकार्ता येथून निघाले आणि चार मिनिटानंतरच रडारवरून गायब झाले. विमानात चालक दलातील 12 सदस्यांसह एकूण 62 लोक होते. एअरलाइन्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे विमान जकार्ताहून बोर्निओ बेटावर पश्चिम कालीमंतन प्रांताची राजधानी पोंटिआनाककडे जात होते आणि हा प्रवास सुमारे 90 मिनिटांचा होता.
जकार्ताच्या उत्तरेस समुद्रात बचाव दलाला विमानाचा काही भाग सापडला आहे. काही स्थानिक मच्छिमारांनीही विमानाचे अवशेष आढळल्याचं म्हटलं आहे. हे विमान सुमारे 27 वर्षापासून सेवेत होते.