...आणि हायवेवर झाले विमानाचे लॅंडींग !

एका छोट्या विमानाचे इंजिन फेल झाल्याने त्याचे रस्त्यावर इमरजेंसी लॅंडींग करण्यात आले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 30, 2018, 07:45 PM IST
...आणि हायवेवर झाले विमानाचे लॅंडींग ! title=

नवी दिल्ली : एका छोट्या विमानाचे इंजिन फेल झाल्याने त्याचे रस्त्यावर इमरजेंसी लॅंडींग करण्यात आले. कॅलिफॉर्नियातील कोस्टा मेसाच्या ५५ फ्रिवेवर हे लॅंडींग करण्यात आले. जोरदार हवेमुळे विमानाला जवळच्या एअरपोर्टवर उतरवणे शक्य झाले नाही त्यामुळे हायवेवर विमान उतरवण्यात आले. 

Costa Mesa, Plane, Engine Fail, Plane Engine, Social Media

याबद्दल पायलटने मीडिला सांगितले की, ज्यावेळी इंजिनने काम करणे बंद केले तेव्हा सेन डियागोहुन वेन नुआसकडे विमान जात होते. अशा स्थितीत पायलटकडे फक्त दोन पर्याय होते. एक म्हणजे जॉन वायनेच्या दिशेने जाणे किंवा मध्येच लॅँड करणे.
मात्र जोरदार वाऱ्यामुळे विमान जवळच्या एअरपोर्टवर लॅँड करणेही शक्य नव्हते. त्यामुळे जवळच्या फ्रिवेवर ते उतरवण्यात आले. डोरा नोरीएजा यांनी याचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला.

सुदैव म्हणजे या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही किंवा कोणतीही दुर्घटना घडली नाही.