Not Allowed! एका चुकीमुळं खेळ खल्लास; 'या' देशानं अमेरिकी नागरिकाला क्षणात नाकारला प्रवेश

Latest World News: आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघालं असता काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होते... 

सायली पाटील | Updated: Nov 22, 2023, 10:31 AM IST
Not Allowed! एका चुकीमुळं खेळ खल्लास; 'या' देशानं अमेरिकी नागरिकाला क्षणात नाकारला प्रवेश  title=
philippines bans American entry for disrespectful behavior world news

Latest World News: ज्या अमेरिकेत जाण्यासाठीचा व्हिसा मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागते त्याच अमेरिकेच्या नागरिकाला एका देशानं चक्क आजन्म प्रवासबंदी घातली आहे. असं नेमकं का? हे जाणन तुम्हालाही धक्काच बसेल. अमेरिकन नागरिकावर बंदी घालणारा हा देश आहे फिलिपिन्स. इछं एंथोनी लॉरेंस नावाच्या एका प्रवाशाला फिलिपिन्सनं दणका देत या देशात त्याच्या प्रवेशावर आजन्म बंदी घालली आहे. 

डिजिटल इमिग्रेशन फॉर्मवर अपमानास्पद शब्द वापरल्यामुळं आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी त्याच्यावर फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली. फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशन कमिश्नर नॉर्न टैनसिंगको यांनी याबाबतीत सविस्तर माहिती दिली. '34 वर्षीय एंथोनी लॉरेंसच्या दुर्व्यवहारानंतर त्याच्यावर देशात बंदी घालण्यात आली. सध्याच्या घडीला त्याचं नाव कायमस्वरुपी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे', असं ते म्हणाले. 

34 वर्षीय लॉरेंस 7 नोव्हेंबरला बँकॉकच्या मनीलाहून निनॉय एक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. फिलिपिन्सच्या अधिकाऱ्यांच्या मते तिथं पोहोचल्यानंतर त्याला एक डिजिटल फॉर्म भरण्यास सांगण्यात आलं, पण तिथंच त्यानं इमिग्रेशन अधिकाऱ्याला चुकीची वागणूक दिली. इतकंच नव्हे, तर आरोपीनं पासपोर्ट आणि मोबाईल दुसऱ्या अधिकाऱ्याच्या दिशेनं फेकला. 

मुळात लॉरेंसनं त्याच्या फॉर्ममध्ये संपूर्ण नाव लिहिलं नव्हतं. पण, तरीही त्यानंच गैरव्यवहार करत अधिकाऱ्यांशी अर्वाच्य शब्दांत वक्तव्य केलं. अधिकाऱ्यांनी झाल्या प्रकरणानंतरही संयम बाळगला. पण, यंत्रणेवरच घाला घालणारं कृत्य केल्यामुळं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती संबंधि अधिकाऱ्यांनी दिली. 

आरोपी म्हणतोय... 

झाल्या प्रकाराचे गंभीर परिणाम पाहिल्यानंतर आपण तीन वेळा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करुनही काहीतरी अडचणी येत होत्या आणि विमानाची वेळही निघून जात होती, ज्यामुळं गडबडीमध्ये आपण त्यांना चुकीची माहिती दिली. चुकीची जाणीव होताच मी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली, पण अधिकाऱ्यांनी यामध्ये रस दाखवला नाही, अशा शब्दांत लॉरेंसनं सारवासारव केली. 

हेसुद्धा वाचा : हाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशांच्या तक्रारी आणि समस्यांसंदर्भात मोठा निर्णय; कसा होणार बदल? 

नियम काय सांगतो? 

फिलिपिन्सकजून सध्याच्या घडीला देशात प्रवासाच्या निमित्तानं येणाऱ्या प्रवाशांकडून कागदोपत्री अर्ज स्वीकारणं बंद केलं असून, आता फक्त हे अर्ज इलेक्ट्रॉनिक स्वरुपातच स्वीकारले जात आहेत. या नव्या नियमामुळं आता फिलिपिन्सला येणाऱ्या आणि तिथून निघणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाच्या किमान 72 तासांपूर्वी डिजीटल स्वरुपातील अर्ज भरणं अपेक्षित आहे.