Viral Video : लाखात एक वर्तुळाकार अंड सापडल्यानं महिलेला भलताच आनंद; किंमत पाहून हैराण व्हाल

Viral Video : मिनिटामिनिटाला असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, यातले काही व्हिडीओ असे काही प्रसिद्धीझोतात येतात की यावेळी इतर गोष्टी मागं पडतात. 

सायली पाटील | Updated: Jun 21, 2023, 11:16 AM IST
Viral Video : लाखात एक वर्तुळाकार अंड सापडल्यानं महिलेला भलताच आनंद; किंमत पाहून हैराण व्हाल title=
perfect round shape egg video goes viral watch

Viral Video : सोशल मीडियामुळं जग जवळ आलं असं म्हणतात आणि ते खरंच आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्याविषयीची माहिती देण्यापासून अगदी जिथं इंटरनेटचटी सुविधाही नाही अशा भागाची दृश्य दाखवण्यापर्यंतची किमया याच सोशल मीडियामुळं शक्य झाली आहे. या माध्यमातून संवाद आणखी सोपा झाला असून, त्याला भाषेच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. मुख्य म्हणजे सातासमुद्रापार घडणारा एखादा चमत्कार पाहण्यासाठीसुद्धा तुम्हाला फारशी प्रतीक्षा करावी लागत नाही. 

अचानकच सोशल मीडियाची महती चर्चेचा विषय ठरण्याचं कारण म्हणजे व्हायरल होणारा एक व्हिडीओ. जिथं एक महिला मोठ्या कौतुकानं तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून देताना दिसत आहे. 

तुम्ही कधी टोमॅटोमध्ये गणपती किंवा हृदयाच्या आकाराचा आंबा असे बहुविध व्हिडीओ पाहिले आहेत का? किंवा तशा चर्चा तरी ऐकल्या आहेत? असाच एक व्हिडीओ आता तुम्हाला थक्क करणार आहे. जिथं एक महिला चक्क किला सापडलेलं एक अंड दाखवत आहे. हे अंड खास यासाठी की, ते पूर्ण वर्तुळाकार आहे.

हेसुद्धा वाचा : राम चरणला साथ देत कोट्यवधींचा व्यवसाय सांभाळणारी त्याची पत्नी ठरतेय महिला वर्गासाठी आदर्श

ऑस्ट्रेलियातील एका सुपरमार्केटमध्ये ही महिला खरेदी करत असताना तिला हे वर्तुळाकार अंड सापडलं. Jacqueline Felgate असं व्हिडीओ शेअर करणाऱ्या महिलेचं नाव असून,  तिनं त्याबाबतची रंजरक माहितीही दिली आहे. या माहितीनुसार Woolworths येथील एका ठिकाणहून हे अंड्यांचे क्रेट आले होते. 

सदरील अंड्याविषयी Google वर शोधलं असता एक बाब तिच्या लक्षात आली ही हे पूर्ण वर्तुळाकार अंड सापडण्याची शक्यता तशी फार कमी असून असं कोट्यवधी अंड्यांतून एखाद्या अंड्याच्या बाबतीत घडतं.  मागं जेव्हा असं अंड आढळलं होतं तेव्हा त्याची विक्री $1,400 म्हणजेच 1,14,697 रुपयांना विकलं गेलं होतं. त्यामुळं आता नव्यानं सापडलेल्या या अंड्यासाठी इतकी रक्कम कोण मोजणार याहूनही ते नेमकं किती रुपयांना विकलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अंड आणि आहारातील त्याचं महत्त्वं... 

अनेकांसाठी अंड म्हणजे परिपूर्ण आहार. कारण, जेवण बनवायला येत असो किंवा नसो, एक अंड बनवता आलं तरीही पोट भरता येतं. डाएटिंग करणाऱ्या मंडळींसाठी तर अंड म्हणजे प्रथिनांचा एक मोठा स्त्रोत. तुम्ही ते कसं खाता यावरही त्यातून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांचं प्रमाण अवलंबून असतं. इथं अंड तळून किंवा इतर कोणत्या पद्धतीनं खाण्यापेक्षा ते उकडून त्यावर मिरपूड आणि मीठ शिवरून खाल्ल्यास होणारे फायदे तुलनेनं जास्त.