पाकिस्तान दिग्दर्शकाचा तरुणीसोबत 'तो' Video Viral, खलील उर रहमान Honey Trap चा शिकार

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दिग्दर्शक खलीलुर रहमान कमर हा महिला आणि तिच्या साथीदारांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. आता या प्रकरणाला मोठे वळण आलंय. एका महिलेसोबतचा त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झालाय.

नेहा चौधरी | Updated: Jul 31, 2024, 02:14 PM IST
पाकिस्तान दिग्दर्शकाचा तरुणीसोबत 'तो' Video Viral, खलील उर रहमान Honey Trap चा शिकार  title=
Pakistani Director obscene Girl Video Viral Khalil Ur Rahman Honey Trap Victim

पाकिस्तानी दिग्दर्शक आणि नाटककार खलील उर रहमान कमर यांच्या एका अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने जगाला हादरवून सोडल आहे. व्हिडीओमध्ये खलील एका महिलेसोबत दिसून येत आहेत. हा व्हिडीओ दोन भागात व्हायरल झाला आहे. पहिल्या भागात खलील एका महिलेसोबत एका खोलीत धूम्रपान करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक पूर्णपणे नग्न अवस्थेत दिसत आहेत. या व्हिडीओनंतर सर्वांचे होश उडाले आहेत. 

दिग्दर्शकाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वीच खलीलुर रहमान कमर हे महिला आणि तिच्या साथीदारांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. या प्रकरणात पोलिसांनी हसन शाह नावाच्या व्यक्तीला अटक केलीय. जो हनी ट्रॅप प्रकरणाचा कथित सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. शहा 12 जणांची टोळी चालवतो आणि त्यात महिलांचाही समावेश असल्याच पोलीस सूत्रांनी माहिती दिलीय. ही टोळी लोकांना अडकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हसनशिवाय पोलिसांनी पेशावरमधून रफिक नावाच्या व्यक्तीलाही अटक केलीय. 

वृत्तानुसार, या टोळीने खलील उर रहमान कमरचं अपहरण केलं होतं. यानंतर त्यांची सुटका करण्यासाठी खंडणी घेण्यात आली. खलीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी या टोळीने दिग्दर्शकाला दिली होती. नुकत्याच दिलेल्या निवेदनात या प्रकरणातील मुख्य आरोपीने दावा केला होता की त्याच्याकडे खलीलचे दोन व्हिडीओ आहेत. दोन्ही व्हिडीओ सुमारे दीड तासाचे असून ज्यामध्ये खलीलला आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधताना दिसत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या जबाबात आरोपी म्हणाले की, 'खलील हा वाईट हेतूने महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्याचे उद्दिष्ट पटकथालेखन नव्हतं तर दुसरं काहीतरी होतं.' मात्र, याला प्रत्युत्तर देताना खलीलुर रहमान कमर यांनी तडजोड करणाऱ्या व्हिडीओसाठी आपलं अपहरण केल्याचा दावा केलाय. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. टोळीतील 12 जणांसह खलीलला भेटलेल्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आलंय.