नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये आज नव्या पंतप्रधानाची (New PM of Pakistan) निवड होणार आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी नॅशनल असेंब्लीतून राजीनामे दिले आहेत. पंतप्रधान निवडीनंतर रात्री 8 वाजता शपथविधी होणार आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) नेते शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी विराजमान होणे जवळपास निश्चित झाले आहे. (New PM of Pakistan)
माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपसभापती कासिम सूरी यांनीही आपली सद्सद्विवेकबुद्धी परवानगी देत नसल्याचे सांगत राजीनामा दिला. कासिम सूरी यांनी पीएमएल-एन नेते अयाज सादिक यांना पुढील अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवण्यास सांगितले. यानंतर अयाज सादिक आता सभागृहाचे कामकाज हाताळत आहेत. पीटीआयच्या खासदारांनी सभागृहातून वॉकआउट केले.
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने पंतप्रधानपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. यासोबतच इम्रान यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी राजीनामे दिले आहेत. खासदारांसोबतच उपसभापतींनीही राजीनामा दिला.