पाकिस्तानमध्ये आई-वडिलांनी मृत मुलीच्या कबरीवर लावलं टाळं, संतापजनक कारण समोर

Pakistan: पाकिस्तानमध्ये मृत महिलांवर बलात्कार केला जात असल्याची काही प्रकरणं समोर आल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. या घटनांनी जगभरात खळबळ उडाली आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 29, 2023, 08:53 PM IST
पाकिस्तानमध्ये आई-वडिलांनी मृत मुलीच्या कबरीवर लावलं टाळं, संतापजनक कारण समोर title=

Pakistan : पाकिस्तानमध्ये धक्कादायक आणि तितक्याच संतापजनक घटना समोर आल्या आहेत. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इथले अनेक नागरिक आपल्या कुटुंबातील मृत महिलांच्या कबरीवर (Graves) टाळं लावतायत. कारण मृत महिलांवर बलात्कार  केला जात असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानमधल्या डेली टाइम्सने (Daily Times) हे वृत्त दिलं असून मृतदेहाची विटंबना केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्याचं या वृत्तात म्हटलंय. 

'द कर्स ऑफ गॉड, व्हाई आई लेफ्ट इस्लाम' या पुस्तकाचे लेखक हॅरिस सुल्तान यांनी हे कृत्य घृणास्पद असून यामागे कट्टरपंथीय असल्याचं म्हटलंय .पालक आपल्या मृत मुलींच्या कबरीवर टाळं लावतात, कारण त्यांना भीती आहे त्यांच्या मुलीच्या मृतदेहाची विटंबना होऊ नये, असं हॅरिस सुल्तान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

2011 मध्ये पहिलं प्रकरण
नेक्रोफीलियाचं पहिलं प्रकरण 2011 मध्ये पाकिस्तानच्या निजामबादमध्ये समोर आलं होतं. कबरीस्ताचा सुरक्षारक्षक असलेल्या रिझवान नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती. आरोपीने 49 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला होता. पाकिस्तानमधल्या कराची आणि इतर शहरातीही अशा घटना समोर आल्या आहेत. सिंध प्रातांतील एका गावात 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाबरोबर विकृत प्रकार करण्यात आला. त्याआधी आरोपींनी एका महिलेचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून घाणेरडं कृत्य केलं होतं.

40 टक्के महिला हिंसाग्रस्त
मानवाधिकार आयोगाने दिलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तानात 40 टक्क्याहून अधिका महिला कधी ना कधी हिसेंच्या शिकार ठरल्यात. याप्रकरणी अद्याप पाकिस्तान सरकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे पाकिस्तानात महिलांच्या कबरीवर लोखंडाचं गेट लावलं जात असून त्याला टाळवलं लावण्यात येतंय. पण यानंतही असे घृणास्पद प्रकार थांबवण्याचं नाव घेत नाहीएत. 

जमीयत उलाम ए इस्‍लाम पाकिस्‍तानचे मौलाना राशिद यांनी या घटनेची तीव्र शब्दात निंदा केली आहे. जीवंत असताना महिला वाईट नजरेपासून स्वत:ला कशाबशा वाचवत होत्या. पण प्रकरण आता त्यांच्या कबरीपर्यंत पोहोचलं आहे. हे भयंकर तर आहेच पण देशासाठी लाजीरवाणंही असल्याचं मौलाना राशिद यांनी म्हटलंय. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी केलीय.

नेक्रोफिलिया म्हणजे काय?
नेक्रोफिलिया हा एक ग्रीक शब्द आहे. नेक्रो म्हणजे मृतदेह आणि फीलिया म्हणजे प्रेम. नेक्रोफिलिया म्हणजे मृतदेहाबरोबर संबंध प्रस्थापित करुन आनंद मिळवणं.