पाकिस्तानच्या हेरने केली स्वत:च्या देशाची पोलखोल

 पाकची गुप्तचर संस्था दहशतवाद्यांना 'सुरक्षा' देते असे या याचिकेत म्हटले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 26, 2017, 09:14 PM IST
पाकिस्तानच्या हेरने केली स्वत:च्या देशाची पोलखोल title=

कराची :  पाकिस्तानी गुप्तहेर शाखेच्या अधिकाऱ्याने स्वत:च्याच देशाची पोलखोल केली आहे. पाकिस्तानी इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) मध्ये काम करणाऱ्या मलिक मुख्तार अहमद शहजाद यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  पाकची गुप्तचर संस्था दहशतवाद्यांना 'सुरक्षा' देते असे या याचिकेत म्हटले आहे. मलिक इंटेलिजन्स ब्यूरोमध्ये उपनिरीक्षक आहेत. पाकिस्तानी आयबी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत नाही असेही मलिक यांनी सांगितले आहे.

डॉनच्या वृत्तानुसार, इस्लामाबाद हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेची आयएसआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आली आहे. आयबीच्या महासंचालकांकडे यासंबंधी तक्रार केली होती परंतु त्यांनी कोणतीही कृती केलेली नाही. मलिककडे यासंबधी पुरावेही आहेत असेही म्हटले जात आहे.