हाफिज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईद याच्या पक्षावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 29, 2017, 11:40 PM IST
हाफिज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी  title=

नवी दिल्ली : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईद याच्या पक्षावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने हाफिज सईदच्या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. गृह मंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे हाफिज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

२००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईद याच्यावर अमेरिकेने १ कोटी डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) वर अधिकृतरीत्या पक्ष म्हणून मान्यता न देण्याची मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाचे प्रवक्ता हारून यांनी शनिवारी माहिती दिली की, पूढील महिन्यात मिल्ली मुस्लिम लीग राजकारणात उतरणार आहे. या पक्षाचा प्रमुख सैफुल्ल खालिद आहे. खालिद हा लष्कर ए तोयब्बाच्या सईदचा मित्र आहे.