मुंबई : पाकिस्तानात इमरान खान यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन झालं आहे. रणनीतीनुसार इमारान खान यांचा विजय हा लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयमुळे झाला. इमरान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले असले तरी सत्तेच्या खऱ्या चाव्या या लष्कर आणि आयएसआयच्या हातातच आहेत.
पाकिस्तानचं लष्कर आणि आयएसआय काश्मीरच्या मुद्द्यावर फक्त पाकिस्तानची लोकशाहीच कमकुवत करत नाही आहेत तर पाकिस्तानचा विकास देखील थांबला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर देशाची दिशाभूल करत लष्कराने पाकिस्तानात आपलं वर्चस्व तयार केलं. यामुळेच पुढे जाऊन दहशतवादी संघटना तयार झाल्या ज्यामुळे पाकिस्तानातील लोकशाही संकटात सापडली आहे.
फाळणीनंतर जिन्ना यांचा लवकर मृत्यू आणि पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर पाकिस्तानात या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या. पाकिस्तानला या दोन्ही नेत्यांनी एक दिशा दिली होती पण पाकिस्तानच्या लष्कराने हळूहळू आपलं वर्चस्व वाढवलं आणि काश्मीरच्या मुद्द्यावर माथी भडकावून देशावासियांच्या विकासाला खिळ बसली.
पाकिस्तानच्या लष्करामध्ये पंजाबी मुस्लिमांचं वर्चस्व आहे असं म्हटलं जातं. देशातील इतर समुदायाची संख्या लष्करात कमी आहे. पाकिस्तानात लष्कर प्रमुख बलूची किंवा सिंधी नाही बनत. लष्करी अधिकाऱ्यांमध्ये देखील इतर समुदायांची संख्या कमी आहे. अँटी-पंजाबी मुस्लीम सेंटिमेंट्समुळेच आधीच्या पाकिस्तानात बंगाली राष्ट्रवादाची भावना तयार झाली. यामुळेच 1971 चं युद्ध झालं आणि याचा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागला. ज्यामुळे पाकिस्तानचे 2 तुकडे झाले.
पाकिस्तानच्या तुलनेत आज बांगलादेशची अर्थव्यवस्था चांगली आहे. 2017 मध्ये बांगलादेशचा जीडीपी ग्रोथ 7.30 टक्के होता तर पाकिस्तानचा 4.71 टक्के होता. पाकिस्तानच्या परकीय मुद्रा भंडारात एप्रिल 2018 पर्यंत 17,539 मिलियन डॉलर होते. जे खूप जलद गतीने घसरत आहे. बांगलादेशची परकीय मुद्रा भंडारात 30,937 मिलियन डॉलर आहेत जे वाढत आहे.