नवी दिल्ली : सीमेवर तणावाचा वातावरण असताना भारत आणि पाकिस्तानच्या नव्या सरकारमध्ये अधिकृत चर्चा सुरु होऊ शकते. सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी म्हटलं की, भारतासोबत चांगल्या संबंधासाठी चर्चाच एकमेव मार्ग आहे. इस्लामाबादमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या नव्या सरकारमध्ये पहिली अधिकृत चर्चा होणार आहे. या बैठकीत काश्मीर मुद्द्यावर चर्चा नाही होणार.
सिंधु नदी कराराबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. स्थायी सिंधु आयोग (पीआयसी)कडून भारताचं प्रतिनिधीत्व पीके सक्सेना आणि पाकिस्तानकडून सैयद मेहर अली शाह चर्चा करणार आहेत.
इमरान खान यांनी म्हटलं होतं की, जर भारत एक पाऊल पुढे येतो तर ते 2 पाऊल पुढे येतील. पीएम मोदींनी नव्या सरकारचे पंतप्रधान इमरान खान यांना फोन करुन शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सोबतच एक बॅट देखील भेट केली होती.
'पाकिस्तानला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. काश्मीरसह सर्व मुद्द्य़ांवर समाधान करणारी चर्चा करु इच्छित आहे.' असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटलं आहे.