नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरच्या पुंछ भागात पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचे उल्लंघन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी पुंछ भागातील शाहपुर येथे झालेल्या चकमकीत एका भारतीय वीराने आपल्या प्रणाची आहूती दिली आहे. शहीद झालेल्या भारतीय जवानाचे नाव हरी वाकर असे आहे. हरी वाकर हे राजस्थानचे नागरिक होते. त्यामुळे राजस्थान आणि देशात शोककळा पसरली आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण रूग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये स्थित असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या स्थळांना उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधींचे उल्लंघन होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.