Pakistan: पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ, इम्रान खान यांची खूर्ची जाणं निश्चित

No Confidence Motion Against Imran Khan : पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप झाला आहे. इम्रान खान यांच्या सरकारमधील 50 मंत्री बेपत्ता झाले आहेत. इम्रान खान यांचा तणाव वाढला आहे.

Updated: Mar 26, 2022, 03:56 PM IST
Pakistan: पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ, इम्रान खान यांची खूर्ची जाणं निश्चित title=

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणातून सध्या एक मोठी बातमी येत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे ५० मंत्री अविश्वास प्रस्तावापूर्वी  (No Confidence Motion) बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयला यामुळे मोठा झटका बसला आहे. इम्रान खान यांची खुर्ची जाण्याची शक्यता आहे.

इम्रान खान  (Imran Khan)  यांच्या सरकारमधील 25 फेडरल, 19 सहाय्यक आणि 4 राज्यमंत्री बेपत्ता आहेत. संकटाच्या काळात इम्रान खान यांचे मंत्री मैदानातून पळून गेले आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

विशेष म्हणजे या संकटात अनेक जवळच्या मित्रांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची साथ सोडली आहे. 28 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. अविश्वास प्रस्तावावर 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत मतदान होणार आहे.

पाकिस्तानी संसदेत शुक्रवारी इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव विरोधकांना मांडता आला नाही. आता सोमवारी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. दरम्यान, इम्रान सरकारने सत्तेतून बाहेर पडल्यास वेळेआधी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजेच विरोधकांना मात देण्यासाठी इम्रान खान निवडणुकीची खेळी खेळू शकतात.

इम्रान खानच्या भीतीचे आणखी एक कारण आहे. पाकिस्तानच्या 75 वर्षांच्या इतिहासात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा एकही पंतप्रधान झालेला आलेला नाही. आता इम्रान खान या इतिहासाचा सिक्वेल ठरू शकतात.