नॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविष्यवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली

2024 या वर्षाची सुरुवात अत्यंत भयावह झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपानं हादरले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्रात 5 मीटर उंच लाटा उसळल्या. नॉस्ट्रॅडॅमसने आधीच याचे भाकित केले होते. 

वनिता कांबळे | Updated: Jan 3, 2024, 10:41 PM IST
 नॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविष्यवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली  title=

Nostradamus 2024 Prediction : 2024 या वर्षाची सुरुवातच विनाशाने झाली आहे.  2024 वर्ष अत्यंत भयानक असेल. नॉस्ट्रॅडॅमसने केलेली भविष्यवाणी बाबा वेंगापेक्षा जास्त डेंजर होती. यांच्यासह जिवंत नॉस्ट्रॅडॅमसने देखील धोक्याचा इशारा दिला होता. नॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविषवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली आहे. यामुळे जगाची चिंता वाढली आहे. 

रशिया-युक्रेन युद्धानं सा-या जगाची झोप उडवलीय. मात्र, कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकित नॉस्ट्रॅडॅमसने वर्तवले होते.  2024 वर्ष अत्यंत भयानक असेल भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली होती. हवामान बदलाचा भयानक परिणमा मानवावर होवू शकतो. भयानक चक्रीवादळे, जंगलातील आग आणि सतत वाढत जाणारे तापमान मानवासाठी धोकादायक ठरू शकते.  चाळीस वर्षानंतर  इंद्रधनुष्य दिसणार नाही. वाढत्या तापमानमुळे कोरडी पृथ्वी पडेल. मोठा पूर येईल. 2024 मध्ये अणु स्फोटाचा इशारा देतो याचा परिणाम हवामानावर होईल असे भाकित  नॉस्ट्रॅडॅमसने केले होते. 

वर्षाच्या सुरुवातीलाच भाकित खरं ठरलं

वर्षाच्या सुरुवातीलाच नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित खरं ठरलं. वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024 या तारखेला जपान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं. या भूकंपानंतर जपानच्या किनारपट्टी भागात त्सुनामीच्या लाटा धडकल्यात. पश्चिम जपानमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता 7.5 मॅग्निट्युट एवढी नोंदवण्यात आलीये. या भूकंपानंतर जपानच्या इशिकावा, निगाटा आणि टोयामा या भागात 1 ते 5 मिटर उंचीची त्सुनामी आली.  अशातच एका  'द लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलमधील 37 वर्षीय  एथोस सालोमे (Athos Salomé) याने देखील वर्षाच्या शेवटी विनाश होईल अशी भविष्यवाणी केली होती. हे भाकित वर्षाच्या जुन्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खरे ठरले आहे. तो स्वत:ला 'द लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस' म्हणतो. एथोस सालोमे हा स्वयंघोषित मानसशास्त्रज्ञ आहे.  एथोस सालोमे याने याआधी कोरोना व्हायरस, युक्रेनविरुद्ध युद्ध आणि राणी एलिझाबेथच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्याच्या या  सर्व भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या होत्या. त्याचे अनुयायी त्याची तुलना 16 व्या शतकातील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसशी करतात.  

मृत नॉस्ट्रॅडॅमसची 2024 साठीची भविष्यवाणी

चाळीस वर्षानंतर  इंद्रधनुष्य दिसणार नाही. वाढत्या तापमानमुळे कोरडी पृथ्वी पडेल. मोठा पूर येईल. 2024 मध्ये अणु स्फोटाचा इशारा देतो याचा परिणाम हवामानावर होईल असे भाकित  नॉस्ट्रॅडॅमसने केले आहे. त्याचे 500 वर्षांपूर्वीच युद्धाचं भाकित खरे ठरले आहे. नॉस्ट्रॅडॅमसनं 2022 मध्ये पृथ्वीवर मोठा विनाश होईल असं भाकित वर्तवलं होते ते खरं ठरलं. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धानं संपूर्ण जगाला चिंतेत टाकले. हे युद्ध अद्याप शमलेले नाही. 2020 मध्ये महाभयंकर महामारी येईल हे त्यानंच सांगितलं होतं. नॉस्ट्रॅडॅमसनं भविष्यवाणी आतापर्यंत 70 टक्के खरी ठरलीय. नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीवर सारं जग विश्वास ठेवतं. कारण त्यानं वर्तवलेली बरीचशी भाकितं खरी ठरली आहेत. नॉस्ट्रॅडॅमसने त्याच्या पुस्तकात एकूण 6 हजार 338 भाकितं वर्तवली  आहेत.

बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरतात

नेत्रहीन असलेल्या वेंगा बाबांचा 1996 साली मृत्यू झालाय. मात्र त्याआधीच त्यांनी या भविष्यवाणी करून ठेवल्यात. विशेष म्हणजे ही भाकितं कुठेही लिखित स्वरुपात नाहीत. आपल्या शिष्यांना त्यांनी हे सगळं भविष्य ऐकवलंय. 2024 वर्षासाठी देखील बाबा वेंगाने धोकादायक भविष्यवाण्या केल्या आहेत.