हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या अफवांविषयी मोठा खुलासा

वाचा सविस्तर वृत्त... 

Updated: Apr 27, 2020, 11:29 AM IST
हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या अफवांविषयी मोठा खुलासा  title=
संग्रहित छायाचित्र

प्योनगँग : गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन Kim Jong-Un यांच्या प्रकृतीबाबत बऱ्याच चर्चा पाहायला मिळत आहेत.  तर्कवितर्क लढवले जात आहेत. हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाल्यानंतर किम जोंग मृत्यूशी झुंज देत असल्याचंही म्हटलं गेलं. ज्याविषयी आता उत्तर कोरियातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी माहिती उघड करण्यात आली आहे. 

 बोललं जात आहे. चीनमध्ये तर किम जोंग यांचा मृत्यू झाल्याचीही चर्चा सुरू आहे. या साऱ्यामध्ये आता किम यांच्याविषयी होणाऱ्या या अफवांबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाकडून सातत्याने किम यांच्या गंभीर प्रकृतीच्या अफवा फेटाळण्यात आल्या आहेत. आता दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींच्या परराष्ट्र धोरण सल्लागार चुंग-इन-मून यांच्या म्हणण्यानुसार किम जोंग उन हे हयात असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार किम याच्याप्रती आमच्या सरकारची भूमिका कायम आहे. सध्या ते हयात असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.. शिवाय १३ एप्रिलपासून वोनसन या भागात ते वास्तव्यास असल्याती माहितीही समोर येत आहे. 

 

१५ एप्रिलला उत्तर कोरियाचे संस्थापक आणि किम यांचे आजोबा किम इल सुंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात किम यांचा सहभाग नव्हता. त्यानंतर ते सेना दिवसाच्या कार्यक्रमातही दिसले नाहीत. तेव्हापासूनच त्यांच्या प्रकृतीविषयी बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. इतकंच नव्हे, तर त्यांच्या पश्चात आता त्यांची बहीण किम यो जोंग यांच्या हाती उत्तर कोरियाचे धागेदोरे दिले जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहेत. संपूर्ण जगभरात सध्याच्या घडीला कोरोनाच्या थैमानाचीच चर्चा असली तरीही, उत्तर कोरियाच्या या हुकूमशहांचीसुद्धा तितकीच जास्त चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.