इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; महिला अत्याचाराविरुद्ध उभारला लढा

 शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे.  इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 6, 2023, 03:18 PM IST
इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; महिला अत्याचाराविरुद्ध उभारला लढा title=

The Nobel Prize 2023 : जगभरात सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  इरणमध्ये महिला अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात नर्गिस मोहम्मदी यांचे मोलाचे योगदान आहे. 

नर्गिस मोहम्मदी यांनी इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा उभारला. मानवी हक्क आणि महिला स्वातंत्र्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या लढ्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 

कोण आहेत नर्गिस मोहम्मदी?

नर्गिस मोहम्मदी  या इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राइट्स सेंटर (DHRC) च्या उपाध्यक्षा देखील आहेत. इराणमधील फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी आणि कैद्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभराला होता आणि त्यांच्या लढ्याला यश देखील आले होते. नर्गिस मोहम्मदी यांना  मानवी हक्कांविरोधात लढा देताना कार्यासाठी अनेक वेळा तुरुंगवास देखील भोगावा लागला आहे.

नर्गिस मोहम्मदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित 

नर्गिस मोहम्मदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नर्गिस मोहम्मदी यांनी इराणच्या तुरुंगात महिलांशी होणार्‍या गैरवर्तनाच्या विरोधात आवाज उठवला. नर्गिस मोहम्मदी यांना सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला.  पर अँगर अवॉर्ड, ओलोफ पाल्मे अवॉर्ड, युनेस्को/गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड आणि पेन/बार्बी फ्रीडम टू राइट अवॉर्ड यासारख्या मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे. अनेक आव्हानांचा सामना करत, तुरुंगवास भोगूनही मोहम्मदी यांनी लाढला सुरु ठेवला आहे.