कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर, पुन्हा जगभरात पसरणार?

रोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर नियम केले आहेत. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलाय. 

Updated: Oct 11, 2022, 07:50 PM IST
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर, पुन्हा जगभरात पसरणार? title=

Corona Update : चीन पुन्हा एकदा कोरोनाशी लढा देत आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागलेत. चीनमध्ये नवीन ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट (Omicron Sub Varient) BF.7 आणि BA.5.1.7 आढळून आले आहेत. हा सब व्हेरिएंट उच्च संक्रमणक्षमतेसह अत्यंत संसर्गजन्य आहे, असे म्हटलंय. अत्यंत संसर्गजन्य विषाणू प्रथम वायव्य चीनमध्ये आढळून आला. Amicron चे BA.5.1.7 चे सब व्हेरियंट प्रथमच चीनमध्ये सापडलं असून त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे, अशी माहिती रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण केंद्राचे उपसंचालक ली शुजियान यांनी ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार दिली. (new variant of covid 19 is causing havoc in china)

धोकादायक सब व्हेरिएंट

Omicron चा सब-व्हेरियंट BF.7 हा उत्तर चिनी प्रांत शेंडोंगमध्ये 4 ऑक्टोबरपासून नोंदवलेल्या COVID-19 प्रकरणांमध्ये आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अत्यंत संसर्गजन्य BF.7 कोविड उप प्रकाराविरूद्ध देखील चेतावणी दिली. वेळेत आवश्यक उपाययोजना न केल्यास BF.7 हे सबवेरियंट वेगाने पसरू शकते, अशी भीती ग्लोबल टाईम्सच्या अहवालात म्हटलंय.

चीनने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर नियम केले आहेत. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलाय. त्यामुळे चीन सरकारने लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केलंय. चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या ऑगस्टपासून सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहेत.

Omicron सबव्हेरिएंट BF.7 आणि BA.5.1.7 चीनमध्ये प्रथमच समोर आले आहेत.  9 ऑक्टोबरला चीनमध्ये 1 हजार  939 कोरोनाबाधित सापडले. ही आकडेवारी 20 ऑगस्टनंतरची सर्वाधिक आहे. शांघायमध्ये 34 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, जी तीन महिन्यांतील सर्वाधिक आहे.