Corona व्हायरसचे नवे प्रकार ठरताय अधिक घातक, तिसऱ्या लाटेने वाढवल्या चिंता

कोरोनाचे नवीन प्रकार ठरणार अधिक घातक...

Updated: May 10, 2021, 09:14 PM IST
Corona व्हायरसचे नवे प्रकार ठरताय अधिक घातक, तिसऱ्या लाटेने वाढवल्या चिंता   title=

मुंबई : वारंवार होणार्‍या उत्परिवर्तनांमुळे कोरोना विषाणू अधिक धोकादायक होत चालला आहे. कोरोनाच्या दोन नवीन स्ट्रेनने भारतामध्ये कहर केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जितकी हानी झाली नाही. त्याहून अधिक हानी ही दुसऱ्या लाटेत होत आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) च्या म्हणण्यानुसार, 4 मे पर्यंत 27 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा ब्रिटीन आणि डबल म्युटेंट व्हायरस पोहोचला आहे.

भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के विजय राघवन यांनी ऑक्टोबरनंतर आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला या म्युटेंटलाच जबाबदार धरलं आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत जगभरात दरमहा कोरोना विषाणूचे दोन प्रकार आढळून आले. हे रूपे देखील जुन्या कोरोना विषाणूसारखे होते आणि त्यांच्यामुळे संसर्ग होण्याचा कोणताही धोका नव्हता. परंतु सप्टेंबरच्या शेवटी, तीन रूपे सापडली, जी संपूर्ण जगामध्ये चिंतेचे कारण बनली. ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमधील स्ट्रेनमुळे कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक बनली.

भारत सरकार दुसऱ्या लाटेसाठी भारतातील डबल म्युटेंट व्हायरसला जबाबदार धरत नसले तरी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन हे त्यालाच मुख्य कारण मानतात.

भारतात कोरोनाची दुसरी लाट हळू हळू शिखरावर पोहोचली आहे. कोरोनाची तिसरी लाट इतर रूपांपेक्षा अधिक घातक असेल असे मानले जात आहे. डॉ. के. विजयराघवन यांनी हा धोका स्पष्टपणे दर्शविला आहे. अशी भीती देखील आहे की कोरोनाच्या नवीन प्रकाराविरूद्ध अस्तित्त्वात असलेल्या लसी सुरक्षा देऊ शकतील का?

आयसीएमआरच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, कोरोनाची रूपे ओळखणे कठीण नाही. आतापर्यंत 13 लाखाहून अधिक प्रकारांची ओळख पटली आहे. परंतु भविष्यात कोणता प्रकार अधिक संक्रमक असेल हे सांगता येत नाही. सप्टेंबरमध्ये ब्रिटिश आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रकार डिसेंबरमध्ये अत्यंत संक्रमक बनले. त्याचप्रमाणे नोव्हेंबरच्या अखेरीस भारतात आढळलेला डबल म्युटेंट व्हायरस मार्चमध्ये सुरू झालेल्या दुसर्‍या लाटेचे कारण बनले.