Video थक्क करणारा! नव्या जगाकडे जाणारा 'पिवळा' रस्ता कधी पाहिलाय का?

समुद्राच्या तळाशी असा रहस्यमयी रस्ता सापडला आहे, जो पाहून डायव्हर्स आणि तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. 

Updated: May 12, 2022, 09:48 AM IST
Video थक्क करणारा! नव्या जगाकडे जाणारा 'पिवळा' रस्ता कधी पाहिलाय का? title=

मुंबईः जर अवकाशात अनेक रहस्ये दडलेली असतील, तर समुद्राच्या खोलात अशी अनेक रहस्ये आहेत, जी अद्याप उलगडणे बाकी आहेत. कधी इथून काही विचित्र प्राणी बाहेर पडतात तर कधी छुपा खजिना सापडतो. आता समुद्राच्या तळाशी असा रस्ता सापडला आहे, जो पाहून डायव्हर्स आणि तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. 

पॅसिफिक महासागराच्या पायथ्याशी असलेला हा रस्ता एक्सप्लोरेशन व्हेसेल नॉटिलसच्या संशोधकांनी शोधून काढला आहे.मात्रा याचा अचूक इतिहास अद्याप समजू शकलेला नाही.

समुद्राच्या खोलात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान शास्त्रज्ञांना विटांनी बनलेला हा पिवळा रस्ता दिसला. त्यांनाही समजले नाही की हा रस्ता आतून समुद्रात आला कुठून? किंवा कुठे जातो? संशोधकांनी गंमतीने याला दुसऱ्या जगाचा मार्ग म्हटले आहे. रस्ता शोधणाऱ्या एक्सप्लोरेशन वेसल नॉटिलसच्या संशोधकांनी यासंबंधीचा एक व्हिडिओही यूट्यूबवर शेअर केला आहे.

हे जगातील सर्वात मोठ्या सागरी संवर्धन क्षेत्रांपैकी एक आहे. जर आपण त्याच्या आकाराबद्दल बोललो, तर अमेरिकेच्या सर्व राष्ट्रीय उद्यानांचा समावेश केल्यानंतरही ते त्यांच्यापेक्षा मोठे असेल. आतापर्यंत 3 टक्के क्षेत्रफळ शोधण्यात आले आहे, त्यापैकी हा पिवळा रस्ता देखील एक आहे.ट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संशोधक समुद्राखाली पिवळा रस्ता शोधताना दिसत आहेत.

यामध्ये रस्त्याच्या विटाप्रमाणे आयताकृती ब्लॉक बसविण्यात आले आहेत. संशोधक याला गंमत म्हणून अटलांटिसकडे जाणारा रस्ता म्हणत आहेत. हे एक काल्पनिक बेट आहे, ज्याच्या समुद्रात बुडण्याची पौराणिक ग्रीक कथा आहे. तसे, हा रस्त्यासारखा आकार प्रत्यक्षात रस्ता नसून कोरड्या पडलेल्या तलावाच्या पायथ्याचा आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार झालेली ही भूवैज्ञानिक रचना असू शकते, जी तुटलेल्या रस्त्यासारखी दिसते.