काबूल : Afghanistan Crisis : आताची मोठी बातमी. तालिबान्यांचे (Taliban News) खरे रुप पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. काबूल विमानतळावरुन 150 भारतीयांचे तालिबान्यांकडून अपहरण करण्यात आले आहे. कॉर्डिनेटरसह भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, आम्ही भारतीयांना सुरक्षितेसाठी दुसरीकडे हलविले आहे, असा दावा तालिबानकडून करण्यात आला आहे. मात्र, तो कितपत योग्य आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
काबुल विमानतळावरून आज तालिबानने भारतीयांचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून समजत आहे. काबुल विमानतळावरून तब्बल 150 भारतीयांचे अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे भारतीयांना काबुलमधून बाहेर काढणा-या कोऑर्डिनेटरसह दीडशे भारतीयांचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपहरण झालेल्या भारतीयांची कोणतीही माहिती समोर येत नाही आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अफगाणिस्तानचा पाडाव झाल्यानंतर तालिबान्यांच्या हातात सत्ता गेली आणि संपूर्ण जगात मोठी खळबळ उडाली आहे. आता सगळचे देश आपापल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी धडपड करत आहे. अनेक अफगाण नागरिकांनी मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचे चित्र दिसून येत आहे. काबूल विमानतळावर अफाट गर्दी दिसून येत आहे.
Multiple Afghan media outlets report kidnapping by Taliban of persons awaiting evacuation from #Kabul. Among them are reported to be Indian citizens. No official confirmation of this, more details awaited
— ANI (@ANI) August 21, 2021
या सगळ्या भीषण परिस्थितीमध्येच अजून एक गंभीर बात समोर आली आहे. 150 भारतीयांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालय याविषयी अधिक माहिती घेत असून अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मंत्रालयाने नकार दिला आहे.
दरम्यान, अहमदुल्लाह वसेक नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने 150 भारतीयांचे अपहरण केलेले नसल्याचा दावा अफगाण प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.