पक्ष्याची मॉलमध्ये शॉपिंग, बायकांनाही टाकलं मागे

 एका पक्ष्याचा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Updated: Aug 21, 2021, 11:03 AM IST
 पक्ष्याची मॉलमध्ये शॉपिंग, बायकांनाही टाकलं मागे title=

मुंबई : एका पक्ष्याचा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पक्षी एका मॉलच्या बाहेर उभा आहे आणि त्याची बुद्धिमत्ता दिसत आहे.

44 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पक्षी मॉलच्या बाहेर इकडे तिकडे हिंडताना दिसत आहे. मॉलचा दरवाजा स्वयंचलित आहे. दरम्यान, दार थोडं उघडताच पक्षी लगेच मॉलमध्ये शिरला. काही क्षणांनी समोर येणारे दृश्य खूपच धक्कादायक आहे.

जेव्हा पक्षी मॉलमधून बाहेर येताना दिसला, तेव्हा त्याच्या चोचीत चिप्सचे पॅकेटही दिसले. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पक्ष्याच्या बुद्धिमत्तेचे लोक कौतुक करत आहेत.

बऱ्याच लोकांनी त्याला एक समजदार ग्राहक म्हटले, तर एकाने ट्विट करून त्याला बुद्धिमान पक्ष्याची खरेदी असे म्हटले. त्याचबरोबर, व्हिडिओमध्ये दिसत आहे की मॉलमधून चिप्सचे पॅकेट बाहेर आणल्यानंतर पक्षी त्यातील चिप्स काढून ते खात आहे.