Most Expensive Toilet Paper : तुम्ही सोन्यापासून बनवलेल्या टॉयलेटबद्दल यापूर्वी नक्कीच ऐकलं असेल. दुबईमधील गर्भश्रीमंतांच्या घरी आणि महागड्या हॉटेलमध्ये हे टॉयलेट वापरले जातात. मात्र तुम्ही कधी सोन्यापासून बनवलेल्या टॉयलेट पेपरबद्दल ऐकलं आहे का? वाचून थोडं विचित्र वाटेल पण ऑस्ट्रेलियातील टॉयलेट पेपर मॅन नावाच्या कंपनीने हा असा टॉयलेट पेपर तयार केला आहे. कंपनीने 22 कॅरेट सोन्यापासून हा गोल्डन टॉयलेट पेपर (most expensive toilet paper) बनवला आहे. या पेपरच्या एका रोलची किंमत एवढी आहे की तितक्या किंमतीत भारतामध्ये एखादं छोटं हेलीकॉप्टर विकत घेता येईल. अर्थात कंपनीच्या वेबसाईवटील माहितीनुसार हा गोल्डन टॉयलेट पेपर आऊट ऑफ स्टॉक आहे. सर्व पेपर विकले गेले असून सध्या आमच्याकडे स्टॉक नाही असं कंपनीने म्हटलं आहे.
कंपनीने सोन्यापासून बनवलेला हा टॉयलेट पेपर रोल नेमका कोणाला विकता याबद्दलची माहिती दिलेली नाही. कंपनीने या टॉयलेट पेपर रोलची किंमत 10 कोटी 75 लाख 45 हजार 750 रुपये इतकी ठेवली होती. या पेपर रोलबरोबर शॅम्पेनची बाटली मोफत देण्यात आली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सोन्यापासून तयार करण्यात आलेला हा थ्री फ्लाय टॉयलेट पेपर फारच मुलायम आहे. या कागदाचा वापर करताना त्यावरील सोन्याचे कण खाली पडतील आणि त्वचेला झालेला नाजूक स्पर्श अनुभवता येईल, असा या कागदाचा उल्लेख करताना कंपनीने म्हटलं आहे.
फ्लोरिडा स्माइल्स डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, दुबईमधील महागडी राजेशाही घरं आणि हॉटेलमधील गोल्डन टॉयलेट पाहून सोन्याचा टॉयलेट पेपर बनवण्याची कल्पना आल्याचं कंपनीने सांगितलं. जर टॉयलेट सोन्याचं असेल तर टॉयलेट पेपरसुद्धा त्याच दर्जाचा हवा या संकल्पेनमधून हा पेपर बनवण्यात आला. टॉयलेट पेपर मॅन ही कंपनी टॉयलेट पेपरबरोबरच हॅण्ड सॅनिटायझर्स, क्लिनिंग प्रोडक्ट आणि हॅण्ड ग्लोव्हजसहीत इतर गोष्टींचीही निर्मिती करतं.
हाँगकाँगमधील ज्वेलरी ब्रॅण्ड कोरोनेटने काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने बनवलेल्या गोल्डन टॉयलेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हे गोल्डन टॉयलेट शंघायमध्ये 2019 साली चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोमध्ये सर्वात आधी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. या टॉयलेट सीटमध्ये 40 हजार 815 हिरे बसवण्यात आले होते. या सर्व हिऱ्यांचा विचार केल्यास ते एकूण 334.68 कॅरेटचे होते. कंपनीने टॉयलेटची किंमत 9 कोटी 22 लाख रुपये असल्याचं सांगितलं होतं. काही वर्षांपूर्वी दुबईचे राजा अब्दुल्लाह यांनी आपल्या मुलीला हुंडा म्हणून हे सोन्यापासून बनवलेलं टॉयलेट दिलं होतं.