वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा कहर जगात वाढत आहे. याचा सर्वात मोठा शिकार अमेरिका झाला आहे. अमेरिकेत 24 तासांमध्ये कोरोनामुऴे 2700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या 45 हजारावर पोहोचली आहे. जी जगात सर्वात जास्त आहे.
जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या माहितीनुसार, अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या 8,24,147 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 45,039 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या शेवटच्या काही दिवसांत मृत्यूची तीव्रता वाढली होती आणि रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.
सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेत आतापर्यंत 41 लाखांहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे. लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं जात आहे. तरी देखील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
अमेरिकेतील सर्वात मोठं शहर न्यूयॉर्कमध्ये कोरोना विषाणूचा सर्वात जास्त प्रभाव आहे. येथे आतापर्यंत 15 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूच्या या महामारी पुढे संपूर्ण अमेरिकेने गुडघे टेकले आहेत. डोनाल्ड ट्रंप यांच्यावर विरोधी पक्ष आणि माध्यमांचा दबाव वाढला आहे.