Tang Jian: डोक्यावर 52 कोटींचं कर्ज, तरीही तो खचला नाही...वाचा संघर्षगाथा

Tang Jian: कर्जात हॉटेलसह घरही गेलं, तरीही तो खचला नाही, आता 'हे' काम करून फेडतोय कर्ज 

Updated: Nov 23, 2022, 08:22 PM IST
 Tang Jian: डोक्यावर 52 कोटींचं कर्ज, तरीही तो खचला नाही...वाचा संघर्षगाथा  title=

Restaurant Owner Is Now Street Wendor : कर्जामुळे (Loan) आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी अथवा व्यवसायिकांनी (Businessman) आत्महत्या केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतीलच. मात्र ही घटना याला अपवाद ठरतेय. कारण या घटनेत डोक्यावर 52 कोटींचं कर्ज असलेला दिवाळखोर बिझनेसमन खचला नाही, त्याने आत्महत्या करून माघार घेण्याऐवजी लढण्याचा मार्ग स्विकारला. आणि तो आता रस्त्यावर कबाब विकून आपलं कर्ज चुकवतोय. या बिझनेसमनची ही कथा अगदी संघर्षमय आहे. ही कथा वाचून तुम्हीही आत्मविश्वासाने भरपूर व्हाल. 

कोण आहे हा बिझनेसमन? 

बिझनेसमन (Businessman) नेहमीच रिस्क घेत असतात. ही रिस्कच त्यांना कधी करोडपती तर कधी रोडपती देखील बनवत असते. अशाच एका बिझनेसमनने रिस्क घेतली आणि तो रस्त्यावर आला आहे. या बिझनेसमनच नाव तांग जियान (Tang Jian) आहे.  साऊख चायना मॉर्निग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 52 वर्षांचे तांग जियाने हे एकेकाळी खुप मोठे बिझनेसमन होते. त्यांची रेस्टॉरंटची एक चैन होती. या व्यवसायातून त्यांनी वयाच्या 36 वर्षात करोडोची संपत्ती बनवली होती.  

असा बुडाला कर्जात

अनेक जवळच्या व्यक्तींनी तांग जियाने (Tang Jian) यांना एका उद्योगात पैसा गुंतवण्यास नकार दिला होता. मात्र त्यांच काही न ऐकता तांग जियानेने 2005 साली एका व्यवसायात पैसा गुंतवला होता. हा त्यांचा निर्णय़ चुकला आणि ते कर्जबाजारी झाले होते. त्यांची रेस्टॉरंटची (Restaurant) चैन देखील तुटली. तसेच कर्ज फेडण्यात असमर्थ असल्याने त्यांना दिवाळखोर देखील घोषित करण्यात आले होते. 

तरीही बिझनेसमन खचला नाही

एका उद्योगात तांग जियानेने (Tang Jian) पैसे गुंतवल्याने त्याला मोठं नुकसान झाले होते. त्याच्यावर मोठा कर्जाचा डोंगर होता. हे कर्ज फेडण्यात त्याच रेस्टॉरंट, घर आणि गाड्या देखील गेल्या. मात्र तरीही त्याच कर्ज फिटल नाही. हे सर्व विकून सुद्धा त्याच्यावर 52 हजारांच कर्ज होतो. हे कर्ज फेडण्यासाठी नंतर त्यांनी स्वत: रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरूवात केली आहे. 

रस्त्यावर उघडला स्टॉल

एकेकाळी करोडपती असलेल्या तांग जियानने (Tang Jian) रस्त्याच्या कडेला एक स्टॉल उघडला आणि स्वतः कबाब विकायला सुरुवात केली आहे. सध्या तो रस्त्यावर कबाब विकून आपलं कर्ज फेडत आहे.

दरम्यान जियानच्या (Tang Jian) या संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही कहाणी एकूण अनेकजण प्रेरीत देखील होत आहेत.