मेहुल चोक्सी डोमिनिकामध्येच राहणार, सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण करण्यास दिला नकार

पंजाब नॅशनल बँक  (PNB) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या डोमिनिकामध्ये (Dominica) राहणार आहे.  

Updated: May 29, 2021, 10:01 AM IST
मेहुल चोक्सी डोमिनिकामध्येच राहणार, सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण करण्यास दिला नकार  title=

मुंबई : पंजाब नॅशनल बँक  (PNB) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या डोमिनिकामध्ये (Dominica) राहणार आहे. पूर्व कॅरेबियन सर्वोच्च न्यायालयाने चोक्सीच्या प्रत्यार्पणावर स्थगिती दिली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की जोपर्यंत या खटल्याची सुनावणी संपेपर्यंत फरार हिरा व्यापाऱ्यास कोठेही पाठवले जाणार नाही, तो डोमिनिकामध्येच राहील. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 2 जून रोजी होणार आहे. त्यानंतरच चोक्सीला कोठे पाठवायचे याबाबत निर्णय घेतला जाईल.

तुरुंगाऐवजी हॉटेलमध्ये रहाणार!

हाबियास कॉर्पस याचिकेच्या सुनावणीपर्यंत  फरार  हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला  कुठेही पाठवले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले. या खटल्याच्या पुढील सुनावणीपर्यंत त्याला येथेच रहावे लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, मेहुल चोक्सी याला सध्या कारागृहात ठेवण्यात येणार नाही. त्याऐवजी, तो हॉटेलमध्ये पाच दिवस क्वारंटाईन केले जाऊ शकते. तथापि, येथे त्याचे बारकाईने निरीक्षण केले जाईल.

वकिलांना भेटण्याची परवानगी

न्यायालयाने मेहुल चोक्सी याला त्याच्या वकिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त त्याला वैद्यकीय सुविधा व कोविड -19 ( COVID-19) तपासणीसाठी रुग्णालयात नेले जाईल. दरम्यान, आता केवळ पाच दिवसांनंतर चोक्सी याला पुन्हा अँटिगा (Antigua) येथे पाठविले जाऊ शकते.  चोक्सी वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर झाला नाही तर सुनावणीच्या वेळी फक्त त्याचा वकील उपस्थित होता.

डोमिनिका जबरदस्तीने आणल्याचा आरोप

फरार मेहुल चोक्सी याच्या  वकिलांने डोमिनिकाच्या  (Dominica) न्यायालयात मेहुल चोक्सीला न्यायालयात हजर करण्यासाठी आणि आवश्यक कायदेशीर मदत देण्यासाठी हबीस कॉर्पस याचिका  (Habeas Corpus Petition)दाखल केली. या सुनावणीनंतर त्याच्या प्रत्यार्पणावर निर्णय घेण्यात येईल. यापूर्वी मेहुल चोक्सी याचे वकील विजय अग्रवाल यांनी असा आरोप केला की चोक्सी यांना सक्तीने डोमिनिका येथे आणले गेले.

वकीलांकडून छळाचा आरोप

विजय अग्रवाल यांनी दावा केला की, चोक्सी यांना अँटिगाहून सक्तीने डोमिनिका येथे नेले गेले. अग्रवाल यांनी असे सांगितले की, यावेळी चोक्सीवर अत्याचार केले गेले. त्याच्या शरीरावर छळाचा खुणा दिसतात.  दरम्यान, पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी अँटिगा येथून पलायन करुन अँटिगा येथे पळून गेला होता. जिथून त्याला थेट भारतात पाठविण्याची चर्चा सुरू होती. तथापि, याक्षणी हे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.