VIDEO VIRAL : चित्रपटाला शोभेल असा रिअल लाईफ थरार कॅमेरात कैद; बर्फाची लाट येताच क्षणात होत्याचं नव्हतं....

VIDEO VIRAL : कानठळ्या बसतील इतका आवाज झाला, समोरून बर्फाची लाट आली आणि त्यांच्यावर धडकली.... पुढे एकच घुसमट.... सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भयंकर होती ते स्पष्ट होत आहे. 

Updated: Jan 14, 2023, 10:32 AM IST
VIDEO VIRAL : चित्रपटाला शोभेल असा रिअल लाईफ थरार कॅमेरात कैद; बर्फाची लाट येताच क्षणात होत्याचं नव्हतं....  title=
massive avalanche at mount manaslu video goes viral

VIDEO VIRAL : एखादा चित्रपट पाहिल्यानंतर आपण एकतर त्यापासून प्रेरित होतो किंवा त्याविषयी प्रचंड विचार करु लागतो. काही चित्रपटांचा आपल्या मनावर असा काही ठसा उमटतो की वेळोवेळी आपण त्याचेच संदर्भ देत सुटतो. सध्या चित्रपट आणि प्रत्यक्ष आयुष्याची सांगड घालण्याविषयी चर्चा करण्याचं कारण ठरत आहे एक व्हिडीओ. सोशल मीडियावर आणि विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर (instagram) हा व्हिडीओ झपाट्यानं व्हायरवल होत असून, त्याला अनेकांनी शेअरही केलं आहे. हिमस्खलनाच्या या व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्य नकळतच आपल्याला एखाद्या हॉलिवूडपटाचा थरार (Hollywood Movie) आठवून देत आहेत. 

'एवरेस्ट' (Everest) किंवा तत्सम चित्रपट पाहिले असतील तर तुमच्या ही बाब लक्षात येईल. @nimaclimber या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडीओ Mount Manaslu येथील बेसकँप (avalanche Viral Video) परिरातील असल्याचं कळत आहे. 

व्हिडीओ पाहून कानठळ्या बसतील.... 

या व्हिडीओमध्ये सुरुवातीपासूनच मन विषण्ण करणारा एक आवाज कानांवर पडतो. पाहिलं तर, गिर्यारोहकांच्या तंबूंच्या दिशेनं डोंगराच्या टोकापासून एक हिमप्रपात मोठ्या वेगानं येताना दिसत आहेत. ज्या व्यक्तीनं व्हिडीओ टीपला आहे, तो काही पावलं पुढे जातोय तोच ही बर्फाची लाट त्यांच्यावर आदळल्याचं लक्षात येत आहे. कारण, तो आवाजच कानठळ्या बसवत आहे. 

nimaclimber नं लिहिलेल्या कॅप्शननुसार सुरुवातीला सगळेच हसत होतो, हे इतकं गंभीर नाही असं सांगत होतो. थोडक्यात प्रत्यक्षदर्शींनाही हे हिमस्खलन प्राथमिक स्तरावर इतकं मोठं नसल्याचं वाटलं, पण क्षणातच त्यांना तिथून पळ काढावा लागला. हे पांढरं वादळ आपल्या आणखी जवळ येत असून, ते तितकंच मोठं आणि महाभयंकर आहे हे कळायच्या आतच ते त्यांच्यावर धडकलं. सुदैवानं यामध्ये कुणाचाही मृत्यू ओढावला नाही, किंवा गंभीर दुखापतीचीही नोंद नाही. हो, पण हा अनुभव मात्र अंगावर काटा आणणारा होता असंच या कॅप्शनमधून लक्षात येत आहे. 

गिर्यारोहण करताना अशा गोष्टी अनेकदा घडतात 

हिमच्छादित पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहण करणाऱ्या अनेक गिर्यारोहकांनी आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. मोठमोठाल्या डोंगरांवरून अतिप्रचंड वेगानं बर्फाचे लोट खालच्या दिशेनं येताना ते वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट गिळंकृत करत येतात. त्यामुळं अशा संकटांमध्ये जीव वाचण्याची शक्यता कमी असते. पण, इथं मात्र या मंडळींचं नशीब बलवत्तर, असंच म्हणावं लागेल.