अन् ही महिला रातोरात झाली 'अब्जाधीश'

अमेरिकेतील मेविस वांगजिक या ५३ वर्षीय महिलेला ५०० अरब रूपयांची लॉटरी लागली आणि रातोरात मेविस अब्जाधीश झाली आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथे राहणारी मेविस जॅकपॉट लॉटरी जिंकली आणि रातोरात तिचं आयुष्य बदललं आहे. 

Updated: Aug 30, 2017, 06:28 PM IST
अन् ही महिला रातोरात झाली 'अब्जाधीश'  title=

अमेरिका : अमेरिकेतील मेविस वांगजिक या ५३ वर्षीय महिलेला ५०० अरब रूपयांची लॉटरी लागली आणि रातोरात मेविस अब्जाधीश झाली आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथे राहणारी मेविस जॅकपॉट लॉटरी जिंकली आणि रातोरात तिचं आयुष्य बदललं आहे. 
पॉवरबॉल ड्रॉइंग प्रकारातील या लॉटरीमध्ये तिने ५०० अरब रूपये इतकी मोठी रक्कम जिंकली आहे. अमेरिकन लॉटरीच्या इतिहासातील इतक्या मोठ्या रक्कमेची लॉटरी जिंकण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. 
मेविस आपल्या मुलांसोबत बक्षिसाचा धनादेश स्वीकारण्यासाठी आल्या होत्या. या प्रसंगी त्या फारच भावूक झाल्या होत्या. गेली ३२ वर्ष स्प्रिंगफील्ड रुग्णालयामध्ये काम करणार्‍या मेविस यांनी नोकरीचा त्याग केल्याचे यावेळी सांगितले. 'मला लॉटरी लागताच यापुढे मी रुग्णालयात येणार नसल्याचे फोन करून कळवले' असे मेविस यांनी सांगितले आहे. 
कसा होता हा अविश्वसनीय क्षण ? 
'पॉवरबॉलने लॉटरी जिंकणाऱ्या तिकीटाचा क्रमांक त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केला. त्यावेळी माझ्या एका मित्राने मला फोन करुन लॉटरी तिकीटचा क्रमांक तपासून घेण्यास सांगितले. मी लॉटरी जिंकू शकत नाही असे त्याला सांगितले. पण वास्तवात मी लॉटरी जिंकले तेव्हा मला खूपवेळ या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता' असे मेविस यांनी सांगितले.