नवी दिल्ली: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डोळ्यात अश्रू आणतात तर कधी खळखळून हसवतात तर कधी धडकी भरवतात. सोशल मीडियावर असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे तर युझर्सना हे कसं शक्य आहे असा प्रश्नही पडला आहे.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक व्यक्ती जिममध्ये दिसत आहे. जिममध्ये व्यायाम करण्यासाठी तो तयार होत आहे. स्ट्रेचिंग व्यायामाला सुरुवात हा व्हिडीओची सुरुवात होते. त्यानंतर असं काही या तरुणासोबत घडतं की तोही खूप घाबरतो. या जिममध्ये तो व्यक्ती एकटाच दिसत आहे. अचानक TRX सस्पेंशन पुढे मागं होऊ लागतं आपोआप मशीन हलायला लागल्याने त्याला आश्चर्य वाटतं.
भारी मेडिसिन बॉल त्याच्या दिशेनं येतो हे पाहून त्याला आणखी धक्का बसतो. काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात येतं. हा सगळा प्रकार पाहून तो खूप घाबरतो आणि लगेच पळून जाण्याचा प्रयत्न करतो.
तो पळायला लागतो त्यावेळी तो खाली पडतो. या व्यक्तीचा पाय कोणीतरी ओढत त्याला घसरत घेऊन जात असल्याचं दिसत आहे. कोणी व्यक्ती व्हिडीओमध्ये दिसत नाही मात्र हा प्रकार घडल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओमध्य कैद झालं आहे.
हा व्यक्ती खूप घाबरला आहे. तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर त्याला यश मिळतं. प्रचंड घाबरलेला व्यक्ती जिममधून आपला जीव वाचवून कसाबसा पळ काढतो. सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओची चर्चा होत आहे. @carlosruizoficial द्वारे हा व्हिडीओ टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना कुठली आहे याची माहिती अजून मिळू शकली नाही.
हा व्हिडीओ पॅरानॉर्मल अॅक्टीव्हिटी आहे की टिकटॉक व्ह्यू मिळवण्यासाठी केलेला प्रॅक आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही. झी 24 तासने या व्हिडीओची सध्यातरी कोणतीही खातरजमा केलेली नाही. हा व्हिडीओ केवळ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.