Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे 'मफलर'मुळे सापडले वादात, किंमत एकूण धक्काच बसेल

Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: भारत जोडो यात्रेतील राहूल गांधी यांच्या टी शर्ट नंतर आता मल्लिकाअर्जुन खरगे यांच्या मफलरची चर्चा सुरू झाली आहे.भाजपने तर या मफलरची किंमत जाहीर करुन टाकली आहे.त्यामुळे आता मफलरमुळे मल्लिकाअर्जुन खरगे वादात सापडण्याची शक्यता आहे.  

Updated: Feb 8, 2023, 09:08 PM IST
Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे 'मफलर'मुळे सापडले वादात, किंमत एकूण धक्काच बसेल  title=

Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी घातलेल्या जॅकेटची खुप चर्चा रंगली होती. ही चर्चा होण्यामागच कारण म्हणजे चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केलेले जॅकेट त्यांनी परिधान केले होते. पंतप्रधानांसह कॉग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) देखील चर्चेत होते. खरगे हे त्यांच्या मफलरमुळे चर्चेत आले होते. मात्र याच मफलरमुळे ते आता वादात सापडले आहेत. नेमका हा वाद काय आहे, ते जाणून घेऊयात.  

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)त्यांच्या निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले होते. हा जॅकेट प्लास्टीक बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार करण्यात आला होता. तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) देखील चर्चेत होते. कारण त्यांनी एक खास मफलर घातला होता. मात्र या मफलरवरून आता खरगे वादात सापडले आहेत. 

मफलरची किंमत किती?

मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांना मफलरमुळे ट्रोल आणि टीकांना सामोरे जावे लागले आहे. तसेच सोशल मीडियावर तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या मफलरची किंमतच जाहिर केली आहे. नेटकऱ्यांचा असा दावा आहे की, ज्या स्पेशल स्कार्फमध्ये खर्गे संसदेत दिसले होते, तो लुई व्हिटॉनचा आहे आणि त्याची किंमत 56,000 रुपये आहे. 

भाजप प्रवक्याकडून फोटो ट्विट 

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी तर मल्लिकार्जुन खर्गेची चांगलीच पोलखोल केली आहे. पुनावाला यांनी ट्विटरवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये पंतप्रधान प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून बनवलेले खास जॅकेट परिधान केलेले दिसले, तर दुसऱ्या फोटोत खर्गे मफलर घातलेले दिसत आहेत. ज्यामध्ये मफलरची किंमत नमूद करण्यात आली आहे. हे मफलर लुई व्हिटॉनचा असल्याचे फोटोवरून कळत आहे, तसेच त्याची किंमत 56,332 रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे इतकं महागडं मफलर घालून मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) संसदेत देशाच्या गरिबीवर बोलत होते. यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. आणि या मफलरमुळे ते वादात सापडले आहेत. तसेच याआधी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचा पांढरा टी-शर्टही चर्चेत आला होता. या टी-शर्टची किंमत सुमारे 41 हजार रुपये असल्याचा दावा याबाबत करण्यात आला होता.