मेड इन चायना, चीनने बनवलाय कृत्रिम सूर्य

चायना मेड वस्तूंनी (Made in china) आपले विश्व व्यापलेले असतानाच आता आकाशात चायना मेड सूर्य (Made in china sun) पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.  

Updated: Dec 18, 2020, 04:22 PM IST
मेड इन चायना, चीनने बनवलाय कृत्रिम सूर्य   title=

मुंबई : चायना मेड वस्तूंनी (Made in china) आपले विश्व व्यापलेले असतानाच आता आकाशात चायना मेड सूर्य (Made in china sun) पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण चीनने कृत्रिम सूर्य (hina sun) बनवलाय. तुमचा विश्वास बसत नसला तरी ही बातमी खरी आहे. या कृत्रिम सूर्यामुळे चीनची ताकद दहा पटींनी वाढणार आहे. नेमका काय आहे हा प्रकार.

चीननं बनवला कृत्रिम सूर्य?
चिनी आकाशात तळपणार कृत्रिम सूर्य?
सूर्यापेक्षा १० पट तळपणार चायना मेड सूर्य

चीनच्या आकाशात आता एकाचवेळी दोन दोन सूर्य दिसल्यास नवल वाटू देऊ नका. चिनी शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य तयार केल्याचा दावा केलाय. चीनच्या सरकारी मीडियानं चिनी शास्त्रज्ञांना असा सूर्य बनवण्यात यश आल्याचा दावा केला आहे. २००६ मध्ये चीनच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य बनवण्याच्या प्रकल्पाला सुरुवात केली. कृत्रिम सूर्याला त्यांनी एचएल-२एम असं नाव दिले आहे.

या चायना मेड सूर्याचं १५ कोटी डिग्री सेल्सियस तापमान असणार आहे. सूर्यापेक्षा चिनी सूर्य १० पट तेजस्वी असेल. अणू फ्यूजनच्या आधारे हा सूर्य तयार करण्यात आलाय. प्रतिकूल हवामानातही सौरऊर्जेचा स्त्रोत चीनकडं कायम राहणार आहे. हा सूर्य म्हणजे चीनकडे अगणित ऊर्जा स्त्रोत उपलब्ध होणार आहे.

चीनचा सूर्य हा इतर जगासाठी आव्हान ठरणार आहे. चीनकडे अक्षय ऊर्जेचे भंडारच उपलब्ध होणार आहे. या सूर्याच्या जोरावर चीनचा आक्रमकपणा वाढणार असून त्यांची विस्तारवादी भूमिका इतर देशांसाठी मारक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.