रशिया : रशियन मॉडेल एकॅटेरिना लिसिना ही जगातील सर्वात लांब पाय असलेली महिला आणि मॉडेल आहे. म्हणून तिच्या नावाची नोंद ‘गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झालीय. पण एकेकाळी तिला आपल्या या लांब पायांबद्दल मोठा न्यूनगंड होता.
तिचे लांब पाय बघून अनेकजण तिची 'जिराफ' नाहीतर 'शिडी' म्हणून खिल्ली उडवायचे. यामुळे तर शाळेत अनेकदा ती चेष्टेचा विषय बनत असे. या चेष्टेतून झालेल्या दुःखातून आपणच असे का ? हा पप्रश्न तिला सारखा सतावत असे. पण कालांतराने आपण जगापेक्षा वेगळे आहोत, याची जाणीव तिला होऊ लागली.
६.९ फूट उंच असलेल्या एकॅटेरिनाची मॉडलिंग विश्वात चर्चा होऊ लागली. तिच्या पायांची लांबी १३२ सेंटीमीटर इतकी आहे.
२००८ मध्ये बिजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने बॉस्केटबॉल खेळात रशियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यात तिने देशाला कांस्य पदकही जिंकून दिलं. लांब पायांमुळे जरी तिच्या नावे विक्रम जमा झाला असला तरी या पायांमुळेच रोजच्या आयुष्यात वावरताना तिला अनेक अडचणींना समोरं जावं लागतं. लांब पायांमुळे विमानात किंवा गाडी बसतानाही तिला त्रास होतो. अनेकदा मापाच्या चप्पलाही मिळत नसल्याचं ती म्हणते.