Trending News : सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणं शिक्षिकेला पडलं महागात, जाणून घ्या प्रकरण

Viral News :  ही महिला एक शिक्षिका (lady school teacher) असून तिला सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यामुळे नोकरीवरुन काढण्यात आलं. 

Updated: Oct 24, 2022, 11:22 AM IST
Trending News : सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणं शिक्षिकेला पडलं महागात, जाणून घ्या प्रकरण title=
lady school teacher bold photos on Instagram nmp

Lady School Teacher Instagram  : सोशल मीडियाचा (Social media) जेवढा फायदा होतो तेवढंच त्यापासून तोटाही होतो. सोशल मीडियाच्या नादामुळे तरुण पिढी वाहत जाते आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. सोशल मीडियावर यूजर्स (users) आपल्या पसर्नल लाइफमधील फोटो शेअर करतात. असे फोटो शेअर करणे त्यांना अनेक वेळा महागात पडतं. एका महिलेला सोशल मीडियावर असेच फोटो शेअर करणं खूप महागात पडलं. 

एक छोटीशी चूक पडली महागात

ही महिला एक शिक्षिका (lady school teacher) असून तिला सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यामुळे नोकरीवरुन काढण्यात आलं. झालं असं की, शाळेचे बॉस एकदा इंस्टाग्रामवर स्क्रोल करत होते. तेव्हा त्यांना त्याचा शाळेतील महिला शिक्षिकेचं पेज दिसलं. बॉस त्या पेजवर गेल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण या महिला शिक्षिकेने इंस्टाग्रामवर बोल्डे फोटो शेअर केले होते. तेवढंच नाही त्या पेजवर त्या महिला शिक्षिकेने बिकिनीतील फोटोदेखील होते. या फोटोवर शाळेच्या बॉसने आक्षेप घेतला. (lady school teacher bold photos on Instagram nmp )

शिक्षिकेने नोकरी गमावली 

विशेष म्हणजे इंस्टाग्रामवर या महिला शिक्षिकेचे 3 लाख 90 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.  ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो तिच्या इंस्टाग्राम (Instagram) शेअर करत असायची. 
इंस्टाग्राम पेजवर, महिला शाळेच्या शिक्षिका बिकिनी, मिनी स्कर्ट आणि इतर अनेक ड्रेसमध्ये अनेक फोटोंमध्ये दिसू शकतात. ती सोशल मीडियावर बोल्ड फोटो (bold photos) शेअर करते म्हणून शाळच्या बॉसने तिला कामावरुन काढून टाकलं. दरम्यान ही घटना सध्या सोशल मीडियावर युजर्समध्ये चर्चेचा विषय बनली आहे. एका युजरने सांगितले की, 'शिक्षक शाळेबाहेर असे कपडे घालतात. याचा त्याच्या व्यवसायावर परिणाम होत नाही. शिक्षकाला काढून टाकणे चुकीचे आहे.'

कुठली घटना आहे?

अमेरिकेतील (US) कोलंबियामधील (Colombia) धक्कादायक घटना आहे. येमी असं या शिक्षिकेचं नाव असून सध्या ती शिक्षिका सोशल मीडियावर मुक्तपणे पोस्ट करत आहे. मात्र, आता तिला एका नवीन शैक्षणिक संस्थेत नोकरी मिळाली आहे.