वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीला सध्या लष्करी छावणीचं स्वरूप आलंय. उद्या 20 तारखेला अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आणि विशेषतः अमेरिकेचं संसदभवन असलेल्या कॅपिटॉल हिलवर कडेकोट बंदोबस्त कऱण्यात आलाय.
दोन आठवड्यांपूर्वी कॅपिटॉलवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात चौघांचा बळी गेला होता. त्यामुळे परवाच्या शपथविधीसाठी तब्बल 25 हजार नॅशनल गार्ड्स शहरात तैनात करण्यात आलेत.
त्याचबरोबर शहरातील हजारो पोलीस बंदोबस्तात आहेत. कॅपिटॉल आणि व्हाईट हाऊस असलेला पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू या परिसराची संपूर्ण तटबंदी करण्यात आली असून सर्वसामान्य नागरिकांना तिथं प्रवेशबंदी करण्यात आलीये. दरम्यान, हल्ल्याच्या शक्यतेमुळे कॅपिटॉल बिल्डिंग लॉकडाऊन कऱण्यात आल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलंय.