Viral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल

Joe Biden's Wife Kiss Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (jill biden) यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस (Kamala Harris) यांचे पती डगलस एमहॉफ यांचे भर सभेत चुंबन (kiss) घेतल्याची घटना घडली आहे. 

Updated: Feb 8, 2023, 01:51 PM IST
Viral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल title=

Joe Biden's Wife Kiss Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (jill biden) यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस (Kamala Harris) यांचे पती डगलस एमहॉफ यांचे भर सभेत चुंबन (kiss) घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेतर जगभरात दोघांच्या या चुंबनाची चर्चा रंगली आहे. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.  

राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मंगळवारी रात्री नॅशनल कॅपिटलमध्ये त्यांचे दुसरे स्टेट ऑफ द युनियन भाषण दिले होते. यूएस हाऊस (US House) ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये बहुमत गमावल्यानंतर त्यांचे हे पहिलेच भाषण होते. या भाषणाच्या काही वेळानंतर दोघांचे चुंबन (kiss)घेतलेले फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाले होते. 

व्हिडिओत काय? 

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, कार्यकर्त्यांनी भरलेल्या स्टेजवर कमला हॅरीस (kamla harris husband)  यांचे पती डगलस एमहॉफ उभे आहेत. यावेळेस जो बायडेन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन यांना स्टेजवर येण्याची घोषण केली जाते. या घोषणेनंतर जिल बायडेन स्टेजवर येऊन डगलस एमहॉफ यांचे ओठावर चूंबन घेतात. या चुंबनाची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करतायत,'जिल बायडेनने नुकतेच कमला हॅरिसच्या नवऱ्याचे ओठांवर चुंबन घेतले,असे का युझरने ट्विट केले आहे. तर, जिल बायडेनने कमलाच्या नवऱ्याच्या ओठांवर चुंबन घेतले का? असा विश्वास न बसलेला सवाल आणखीण एका युझरने केला आहे. दरम्यान अमेरीकेतील सर्वांत प्रतिष्ठीत व्यक्तीच्या या चुंबनाची सोशल मीडिय़ावर चर्चा आहे. 

रिपब्लिकन पक्षाला अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीचे आणि देशाला एकत्र आणण्याचे आणि देशातील राजकीय विभाजन कमी करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत सामील व्हा असे आवाहन मंगळवारी स्टेट ऑफ द युनियन भाषणात  राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी केले होते. यावेळी संबोधना दरम्यान हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर आणि रिपब्लिकन केविन मॅकार्थी बायडेन यांच्या मागे बसलेले दिसले होते. 

बायडेन (Joe Biden) यांनी आपल्या भाषणाद्वारे देशाला विश्वास देण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव देशात आणि परदेशात दिसत आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ते योग्य उमेदवार असल्याचेही पटवून देण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान आता बायडेन (Joe Biden) यांच्या भाषणापेक्षा जिल बायडेन यांच्या कमला हॅरीस यांच्या पतीला केलेल्या चुंबनाची चर्चा रंगली आहे. या घटनेचा व्हिडिओ पाहून नागरीकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे.