भारतामध्ये नव्हे तर परदेशात 'या' ठिकाणी खेळली जाते सर्वात मोठी होळी

भारतामध्ये होळीचा सण हा रंगाचा सण म्हणून खेळला जातो. मात्र आता होळी केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेली नाही.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Mar 2, 2018, 02:46 PM IST
भारतामध्ये नव्हे तर परदेशात 'या' ठिकाणी खेळली जाते सर्वात मोठी होळी  title=

मुंबई : भारतामध्ये होळीचा सण हा रंगाचा सण म्हणून खेळला जातो. मात्र आता होळी केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेली नाही.

परदेशातही होळी मोठ्या प्रमाणात खेळली जाते. जगातील सर्वात मोठी होळी अमेरिकेत  खेळली जाते.  

कुठे खेळली जाते सर्वात मोठी होळी ? 

अमेरिकेत 'फेस्टिवल ऑफ कलर' या नावाने खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अमेरिकेत स्पॅनिश फॉर्कमध्ये बनवलेल्या इस्कॉन टेम्पलमध्ये मोठ्या प्रमाणात होळीच्या सणाचे आयोजन केलेले असते.  

 

राधा कृष्ण मंदिरात होळी  

राधा-कृष्णाच्या मंदिरामध्ये 'फेस्टिवल ऑफ कलर' या खास सोहळ्यात सुमारे 35-40 हजार लोकं सहभागी होतात. येथे मोठ्या प्रमाणात होळीचा सण खेळला जातो. आयोजकांचा दावा आहे की, सुमारे 40,000 लोकं एकाच ठिकाणी होळी खेळतात.  

स्थानिकांचा समावेश 

अमेरिकेतील उटा राज्यातील स्पॅनिश फोर्कशिवाय अन्य 11 ठिकाणी होळीच्या सणाचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी स्थानिक लोकांप्रमाणेच विद्यार्थीदेखील सहभाग घेतात. 

धार्मिक नाही तर अध्यामिक पर्व - 

अमेरिकेत आयोजित या सोहळ्याला धार्मिक रंग नसून केवळ आध्यात्मिक कारणासाठी लोकं एकत्र येतात. या होळीमध्ये अनेक जाती - धर्माचे, जगाच्या विविध ठिकाणाहून आलेली लोकं एकत्र येतात. 

आयोजकांच्या दाव्यानुसार अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे वेगवेगळ्या धर्माची लोकं एकमेकांच्या अधिक जवळ येतात. जात- धर्माची बंधनं दूर होऊन आपण सारे एक आहोत ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते.