तरुणांना इसिसमध्ये भरती करणाऱ्या महिलेला अटक

तरुणांना शोधून त्यांचा दहशतवादी कृत्य करण्यासाठी 'इसिस'मध्ये भरती करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झालाय. 

Updated: Oct 21, 2017, 10:10 PM IST
तरुणांना इसिसमध्ये भरती करणाऱ्या महिलेला अटक  title=

मनिला : तरुणांना शोधून त्यांचा दहशतवादी कृत्य करण्यासाठी 'इसिस'मध्ये भरती करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झालाय. 

आयशा हामिदन या महिलेला राष्ट्रीय चौकशी एजन्सीनं (NBI) फिलिपिन्समधून अटक केलीय. आयशा फिलिपिन्सचा मृत दहशतवादी नेता मोहम्मद जफार मॅकिड याची पत्नी आहे. तिचं खरं नाव आयशा अल-मुस्लिमाह आहे.

काय होतं हामिदनचं काम?

हामिदनकडे इसिससाठी नव्या दहशतवाद्यांना शोधून त्यांना संघटनेत भरती करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. 

एनआयएसनं फिलिपिन्स सरकारकडून हामिदनबद्दल माहिती मिळवण्यासाठी मदत मागितली होती. त्यानंतर एनबीआय हामिदनच्या मागावर होती.

भारतात इसिसचे दहशतवादी मोहम्मद सिराजुद्दीन आणि मोहम्मद नासिर यांना अटक झाल्यानंतर एनआयएचा हामिदनवर संशय बळावला.

फेसबुक, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून भारत, यूएई, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांग्लादेशातील तरुणांना हामिदन संपर्क साधत होती.

धक्कादायक म्हणजे, मुंबई, तिरुचिरापल्ली, हैदराबाद, श्रीनगर, सोपोर, कानपूर, कोलकाता आणि जयपूरहून अनेक भारतीयांनी हामिदनशी संपर्क केल्याचंही समोर आलंय.