फोटोग्राफर होता म्हणून, नाही तर फोटोच्या नादात जोडप्याचा जीव गेला असता; पाहा थरारक व्हिडिओ

सेल्फीच्या नादात अनेकांचा जीव गेला आहे. मात्र, फोटोग्राफरच्या सतर्कतेमुळे एका जोडप्याता जीव वाचला आहे. 

Updated: Jul 27, 2023, 06:52 PM IST
फोटोग्राफर होता म्हणून, नाही तर फोटोच्या नादात जोडप्याचा जीव गेला असता; पाहा थरारक व्हिडिओ  title=

Viral Video : फोटो काढण्याच्या नादात एक जोडपं समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेले. यात महिलेचा मृत्यू झाला. मुंबईच्या बँड स्टँड येथे ही घटना घडली होती. याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर अशाच उंच लाटेचा थरार इंडोनेशिया मध्ये घडला आहे. फोटोच्या नादात जोडप्याचा गेला जीव असता. मात्र, वेळीच या जोडप्याला फोटोग्राफरने सावध केले नाहीत एका क्षणात होत्याचं नव्हत झालं असता. हा संपूर्ण थरारा कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

जोडपं बाजूला झालं आणि उंच लाट आली

हा व्हायरल व्हिडिओ इंडोनेशियामधील आहे. इंडोनेशियाच्या एन्जेल्स बिलाबॉन्ग येथील प्रेक्षणीय स्थळावरील हा व्हिडिओ आहे. डोंगर दऱ्यातून वाहणार सुंदर धबधबा आणि प्रदंड वेगाने वाहणारी नदी अशा सुंदर नैसर्गिक वातावरणात हे जोपडं प्री वेडिंग फोटो शूट करण्यासाठी  आले होते. यावेळी नदीच्या किनाऱ्यावर एका छोट्याशा टेकडीवर हे जोडपं फोटो काढत होते. मात्र, यांचा फोटो घेत असतानाच फोटोग्राफरला पाण्याच वेग वाढल्याचे दिसले. फोटाग्राफरने जोरता आवाज देत या जोडप्याला बाजूला होण्याच्या सूचना केला. हे जोडपं नदी किनाऱ्यापासून बाजूला होताच पाण्याचा मो ठा प्रवाह हे जोडपं तिथे फोटो काढत होते त्या खडकावर येवून आदळला.

 

फोटोग्राफरमुळे वाचला जीव

फोटोग्राफरच्या सतर्कतेमुळे या जोडप्याचा जीव वाचला आहे. फोटो काढत असतानाच फोटोग्राफरला सांभाव्य धोक्याचा अंदाज आला. यामुळे फोटोग्राफरने जोडप्याला बाजूला हटण्याच्या सूचना केल्या. जोडपं बाजूला होताचं उंच लाटे प्रमाणे पाण्याचा मोठा लोंढा आला. हे जोडप्या या पाण्याच्या प्रवाहात सापडले असततं तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, फोटोग्राफरने वेळीच सावध केल्यामुळे ते बचावले आहेत. हा संपूर्ण थरारा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सर्वजण फोटोग्राफरचे कौतुक करत आहेत. @sachkadwahai नावाच्या instagram अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.  या व्हिडिओला instagram वर 1,248,990 likes आले आहेत. 

मुंबईच्या जुहू बीचवर पोलिसांमुळे दोघांचे प्राण वाचले

मुंबईच्या जुहू बीचवर पोलिसांमुळे दोघांचे प्राण वाचले होते. जुहू बीच इथं बुडणा-या दोघांना मुलांना मुंबई पोलिसांनी समुद्रातून बाहेर काढले. 7 आणि 10 वर्षाची ही मुलं होती. सांताक्रूझ पोलीस स्टेशनचे हवालदार विष्णू बेळे यांनी तातडीनं धाव घेत समुद्रात बुडणा-या दोन मुलांना सुखरुपपणे बाहेर काढलं.