जय श्रीराम! 'या' मुस्लीम देशात रामाचे असंख्य भक्त

Indonesia Ramayana:  रामाच्या कथेवर आधारित इंडोनेशियातील (Indonesia) सर्वात जुने पुस्तक 'रामायण काकावीन' (Ramayana Kakaveen) आहे. 

Updated: Nov 15, 2022, 08:23 AM IST
जय श्रीराम! 'या' मुस्लीम देशात रामाचे असंख्य भक्त title=

India-Indonesia Relations: इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून 960 किमी अंतरावर असलेल्या बाली येथे आहे. यामध्ये इंडोनेशियातील 90 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. तरीही रामायणाचा त्यांच्या संस्कृतीवर मोठा प्रभाव आहे. भारतीय संस्कृतीची झलक संपूर्ण इंडोनेशियामध्ये पाहायला मिळते. इंडोनेशियाशी भारताचे सांस्कृतिक संबंध 2500 वर्षांपूर्वीचे आहेत. इंडोनेशियातील लोकांच्या मनात भगवान रामाबद्दल विशेष स्थान आणि आदर असून दक्षिण पूर्व आशियात (South East Asia) असलेल्या इंडोनेशियाची (Indoneshia) लोकसंख्या साधारण 23 कोटी आहे. हा जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा चौथा देश आहे. 

 इंडोनेशियामध्ये रामायणाचे महत्त्व

मोठ्या प्रमाणात मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात (Indoneshia) भगवान राम (Lord Rama) यांना मानलं जातं. रामकथा म्हणजे रामायण (Ramayan) हा या देशातील महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. इथले लोक रामाला त्यांच्या जीवनातील आदर्श मानतात. दरम्यान रामायणावर आधारित इंडोनेशियातील सर्वात जुने पुस्तक 'रामायण काकाविन' आहे. रामायण काकवीण कवी भाषेत रचले गेले आहे. ही जावाची प्राचीन शास्त्रीय भाषा आहे. हे पुस्तक कवी योगेश्वर यांनी रचले आहे. इंडोनेशियाच्या रामायणात 26 अध्याय आहेत. येथील रामायणात रामाचे वडील दशरथ यांना विश्वरंजन म्हटले आहे. हे रामायण प्रभू रामाच्या जन्मापासून सुरू होते.

भारत (India) आणि इंडोनेशियातील (Indoneshia) रामायणात थोडा फरक आहे. भारतात अयोध्या (Ayodhya) ही रामाची नगरी मानली जाते, तर इंडोनेशियात 'योग्या' ही नगरी रामाची नगरी म्हणून ओळखली जाते. इथं रामकथेला ककनिन किंवा काकावीन रामायण म्हणतात. भारतीय रामायण ऋषी वाल्मिकींनी लिहिलं तर इंडोनेशियातील कवी योगेश्वरांनी रामायण लिहिलं असं मानलं जातं. भारतात जसं रामलीला असते तसंच इंडोनेशियातही रामकथेवर आधारित नाटकं सादर केली जातात. अशाच एका नाटकातील प्रसंग फोटोत दिसत आहे.     

वाचा :  आताची मोठी बातमी! ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे-शिंदे गटात हाणामारी 

तसेच भारतात लिहिलेल्या रामायणात इंडोनेशियातील जावा बेटाचा संस्कृतमध्ये यवद्वीप असा उल्लेख आहे. रामायणात असा उल्लेख आहे की सुग्रीवाने आपली वानरसेना यवद्वीपावर म्हणजेच सध्याच्या जावा बेटावर पाठवली होती. यवद्वीपावर मौल्यवान रत्न, सोने आणि चांदी सापडल्याचा उल्लेख रामायणात आहे. इंडोनेशियातील सध्याच्या सुमात्रा बेटाचा उल्लेख अनेक भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये देखील आहे ज्यांना सुवर्णद्वीप असे लिहिले आहे.

इंडोनेशियातील रामायणात लक्ष्मणाला नौदलाचा प्रमुख म्हटलं आहे. तर सीतेला सिंता म्हटलं जातं. हनुमान तर इथं सर्वाधिक लोकप्रिय आहे. दर वर्षी या मुस्लीम देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 27 डिसेंबर रोजी राजधानी जकार्ता इथं अनेक तरुण हनुमानाचा वेश धारण करून सरकारी संचलनात सहभागी होतात. यावरून हनुमान इथं किती लोकप्रिय आहे, हे लक्षात येईल. इंडोनेशियात हनुमानाला ‘अनोमान’ म्हणतात.

गेल्या वर्षी इंडोनेशियानं भारतात ठिकठिकाणी इंडोनेशियन रामायणावर आधारित रामलीलेचं सादरीकरण करण्याची परवानगी मागितली होती. इंडोनेशियाचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अनीस बास्वेदन भारतात आले होते तेव्हा त्यांनी भारताचे सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली होती. वर्षातून किमान दोन वेळा तरी भारतात काही ठिकाणी इंडोनेशियन रामायणाचे प्रयोग करण्याची इंडोनेशियाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. . 

चलनावर गणेश चित्र

इंडोनेशियाची राष्ट्रीय भाषा "भाषा" इंडोनेशिया म्हणून ओळखली जाते. तसेच भाषा हा शब्द संस्कृतमधून आला आहे. इंडोनेशियाच्या भाषेत शेकडो शब्द आहेत. जे भारतीय भाषेच्या हिंदी आणि संस्कृतशी संबंधित आहेत. जमीन, वाहन, प्रथम, भय, मनुष्य, सुख, दु:ख, संपूर्ण, काम, संध्याकाळचे भाग्य, काच हे शब्द इंडोनेशियन भाषेत संस्कृत किंवा हिंदीमध्ये समान अर्थासाठी वापरले गेले.