भारतीय तरुणाचा दुबईत रेकॉर्ड; गिनीज बुकमध्ये नावाची नोंद

दिल्लीच्या तरुणाचा वर्ल्ड रेकॉर्ड...

Updated: Jul 9, 2020, 03:08 PM IST
भारतीय तरुणाचा दुबईत रेकॉर्ड; गिनीज बुकमध्ये नावाची नोंद title=

दुबई : दुबईमध्ये भारतीय तरुण सोहम मुखर्जीने एका पायाने 101 वेळा उड्या side-to-side hops मारुन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या रेकॉर्डने त्याच्या नावाची गिनिज बुकमध्ये नोंद केली गेली आहे. दिल्लीचा रहिवासी असलेल्या सोहम मुखर्जीने 30 सेकंदात 96 वेळा उडी मारण्याचा मागचा रेकॉर्ड मोडित काढत पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे.

सोहमने आधीचा रेकॉर्ड मोडित काढल्यानंतर दुसरा नवा रेकॉर्ड केल्यानंतर जागतिक संस्थेने एक निवेदन जारी केलं आहे. यात त्यांनी सांगितलं की, सोहमने केलेल्या रेकॉर्डचा व्हिडिओ काढण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये सोहम मुखर्जीने एकूण 110 वेळा उड्या मारल्या परंतु त्यापैकी 9 उड्या अमान्य घोषित केल्या गेल्या.

सोहमचा उड्या मारतानाचा व्हिडिओ दोन कॅमेरातून रेकॉर्ड करण्यात आला. आणि जवळून स्लो मोशन व्हिडिओही घेण्यात आला होता.

सोहमने याविषयी बोलताना सांगितलं की, उड्या मारताच्या माझ्या हालचाली स्पष्टपणे दिसाव्यात यासाठी व्हिडिओ स्लो मोशनमध्ये शूट करण्यात आला होता. या विक्रमासाठी सोहमने याचं संपूर्ण श्रेय त्याच्या खेळातील सक्रीय सहभागाला दिलं आहे. गेल्या 13 वर्षांत तायक्वांडोमध्ये घेतलेल्या मेहनतीचा, हा रेकॉर्ड करण्यास मदत झाली असल्याचं सोहम मुखर्जीने सांगितलं.